सेटलमेंट करुन राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना शहाणपणा शिकवू नये !

भारतीय जनता पार्टीकडून सुपारी घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची हा एकमेव धंदा राज ठाकरे आणि मनसेने सुरू केला आहे.
Raj Thackeray, Vinayak Raut
Raj Thackeray, Vinayak Raut sarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज टीकास्त्र सोडलं. या टीकेला शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"फक्त सेटलमेंट करून धंदेवाईक राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शहाणपणा शिकवू नये," असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे.

"भारतीय जनता पार्टीकडून सुपारी घेऊन शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची हा एकमेव धंदा राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मनसेने सुरू केला आहे. भाजपाच्या तालावर नाचत, बोटं मोडायची टीका टिपण्णी करायची, हा राज ठाकरे यांचा निवडणुकीपर्यंत चाललेला व्यवसाय आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांना जास्त किंमत देत नाही," असा टोला राऊतांनी लगावला.

'उद्धव ठाकरेंच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? ते कोणती भूमिकाच घेत नाही,'असा आरोप राज ठाकरेंनी केला. त्यावर विनायक राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरेंवर एकही केस नाही, असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी कोणाला जाळून टाकू, कोणाला मारून टाकू, परप्रांतियांना मारून टाकू, अशी धमकीची भाषा वापरून स्वतःवर केसेस घेतल्या आहेत. तर दुसरीकडे लोकांच्या चुली कशा पेटतील त्यांचे संसार कसे उभे राहतील, यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी लोकांचे संसार उभे केले तर राज ठाकरे यांनी लोकांचे संसार पेटवले,"

Raj Thackeray, Vinayak Raut
'मातोश्री'ला मशिद म्हणणाऱ्या राज ठाकरेंना राऊतांनी सुनावलं

"शिवसेनेची क्रेडीबिलिटी काय आहे हे महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. स्वतः पक्षाविषयी त्यांनी बोलावं. दुसऱ्याच्या पक्षाविषयी बोलू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्रात 50 वर्षांपासून काम करत आहे. बाळासाहेबांची क्रेडीबिलिटी आहे म्हणून हा पक्ष पन्नास वर्षे टिकून आहे," असे खासदार संजय राऊत म्हणाले.

Raj Thackeray, Vinayak Raut
'हिंदूत्व' वॉशिंग पावडर आहे का ? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

"मी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी आजच्या सभेत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com