Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी ठाकरेंच्या सभांचा धडाका; राहुल गांधींपेक्षाही...

Loksabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रचारात झोकून देत शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस उमेदवारांसाठीही प्रचारसभा घेत आहेत.
Uddhav thackeray, Rahul Gandhi
Uddhav thackeray, Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरची ही सर्वात मोठी निवडणूक असल्याने भाजप -काँग्रेस, ठाकरे-शिंदेंसह शरद पवार- अजित पवार यांनी ती मोठी प्रतिष्ठेची केली आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा होत आहेत.पण आत्तापर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधींपेक्षा (Rahul Gandhi) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जास्त सभा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Uddhav thackeray, Rahul Gandhi
Supriya Sule News : कोणाला काय मिळालं? याचा हिशोब करा; खूप सोपं उत्तर आहे, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना सुनावले !

महायुती त्यातही बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दिवसाला एकापेक्षा अधिक सभा घेत या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढत आहे.यात विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले पक्ष आणि त्यांचे नेते आता कट्टर प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. तर युती - आघाडीत सोबत लढलेल्यांचं एकमेकांसमोर तगडं आव्हान उभं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रचारात झोकून देत शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस उमेदवारांसाठीही प्रचारसभा घेत आहेत. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधींपेक्षा ठाकरेंनीच काँग्रेस उमेदवारांसाठी जास्त सभा घेतल्याची माहिती समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आत्तापर्यंत काँग्रेस उमेदवारांसाठी अमरावती,सोलापूर, धुळे,भंडारा,पुणे, कोल्हापूर या ठिकाणी सभा घेतल्या आहेत. तर जालना येथे देखील आगामी काळात उद्धव ठाकरे काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्याची शक्यता आहे.पुढच्या टप्प्यांमध्ये प्रियंका गांधी आणि मलिकार्जुन खरगे सभा घेतील.ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी होत असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पण आता ठाकरेंच्या सभांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना हिंदुत्ववादी मतांचा कितपत फायदा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महायुतीकडून महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,राज ठाकरे,राधाकृष्ण विखे पाटील,धनंजय मुंडे, नितीन गडकरी,रामदास आठवले,नवनीत राणा यांच्यासह दिग्गज नेत्यांची फौज प्रचारासाठी मैदानात उतरली आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांकडून सभांचा धडाका लावला आहे. त्यात उद्धव ठाकरे,संजय राऊत,शरद पवार,नाना पटोले,बाळासाहेब थोरात यांच्या सभा होत आहेत.

Uddhav thackeray, Rahul Gandhi
Political News : 'गद्दार' शब्दाचा महिमाच अपार;झुंज तिघींची पण राजकीय संकेतांचा उठला बाजार

महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) गेल्यावेळच्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्ण काळजी घेतली जात आहे.तसेच मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीला होणार नाही यासाठी मोठी रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे.त्यात ठाकरे -पवारांसह पटोलेंसह इतर राजकीय नेत्यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांसाठी होत असलेल्या सभा हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav thackeray, Rahul Gandhi
Loksabha Election 2024 : अबब! 500 पासून ते लाखांपर्यंतच्या पैजा; निकालानंतर कुणाचा खिसा गरम होणार तर कुणाचा खाली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com