Shiv Sena Reshuffle Pune: आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेत खांदेपालट! पुणे जिल्ह्यात दोन मोठे फेरबदल

PCMC Election 2025: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे आणि पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Shiv Sena election strategy Maharashtra
Shiv Sena election strategy MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Pune District Shiv Sena Updates: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्यात येत आहेत. असेच फेरबदल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 ही शिवसेनेच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांशी थेट सामना करण्यासाठी संघटनात्मक बळकटपणा आवश्यक असल्याने पक्षांतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे आणि पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेश खांडभोर जिल्हाप्रमुख, तर शीला भोंडवे जिल्हा संघटिका

आगामी निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार असल्याने त्यादृष्टीने संघटना बांधणी, नियोजन सुरू आहे. त्यासाठी हे बदल करण्यात आले. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्याकडे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांची आता जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.

Shiv Sena election strategy Maharashtra
Arjun Dangle: दिवस आंदोलन, चळवळीचे! कम्युनिस्ट होणे म्हणजे बरबाद होणे असे समजले जायचे....

उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे यांची पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा संघटिकापदी शीला भोंडवे यांची नियुक्ती केली आहे. तर, मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिली.राजेश खांडभोर आणि शीला भोंडवे यांच्यासमोर आता पक्षाचा जनाधार वाढवणे, मतदारांपर्यंत पोहोच वाढवणे आणि निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देणे ही मोठी जबाबदारी आहे.

Shiv Sena election strategy Maharashtra
पिंपरी चिंचवडमध्ये साकारतोय संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा:पाहा फोटो

शिवसेना उपनेते तसेच खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल केले आहेत. शिवसेना पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघात संघटना आणखी मजबूत होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी झपाटून कामाला लागावे. केंद्र, राज्य सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचववेत. राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा,"

Shiv Sena election strategy Maharashtra
Maratha Reservation: 'हैदराबाद गॅझेट'ची अंमलबजावणी सुरु असतानाच मराठा समाजातील 70 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

राजेश खांडभोर

राजेश खांडभोर हे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असून संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेला ग्रामीण भागात आणि शहरी भागात बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

शीला भोंडवे

शीला भोंडवे यांना जिल्हा संघटिकेची धुरा सोपवण्यात आली आहे. महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करून निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट या नियुक्तीद्वारे साधले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com