

Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसविरोधात आघाडी उघडली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं निषेध, मोर्चे काढण्यात येत आहे. याचदरम्यान, दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. मात्र, पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रा काढण्यामागचं कारण सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ठाण्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी शिंदे यांनी नाव न घेता, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले, हिंदुत्वाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत. सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातला हिंदू आता जागा झाला आहे, जागरुक झाला आहे आणि तो आता सक्रीय झाला आहे.
पण काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे असं स्पष्ट मत शिंदेंनी यावेळी व्यक्त केलं आहे.
तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. सावरकर हे देशभक्त होते, राष्ट्रभक्त होते, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पूर्वी लोक हिंदुत्व हा शब्द उच्चारायला कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मान सन्मान जागा झाला असंही शिंदे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या मुद्द्यांवरुन उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. शिंदे म्हणाले, सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे लोक आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत बसण्याचं पाप काही लोक करत आहेत, हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. परंतु, आम्ही मात्र सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही. त्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर देईल असंही शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.