Kapil Sibal On Giriraj Sinh: ..तर निर्भयाच्या मारेकऱ्यांनाही भारताचे सुपुत्रच म्हणायला पाहिजे..; कपिल सिब्बलांचे सिंहांना प्रत्युत्तर

Giriraj Singh On Godse: खुनी कधीही देशाचा सुपुत्र होऊ शकत नाही. खुन्यात धर्म पाहू नये.
Kapil Sibal News
Kapil Sibal NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kapil Sibal Criticized GIriraj Sinh: केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नथुराम गोडसे हे 'भारताचे पुत्र' असल्याचे विधान केले होते. यावरुन आता राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गिरीराज सिंह यांच्या या विधानावर माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी गिरीराज यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. गिरीराज यांच्या वक्तव्यावरून केंद्र सरकारचा हेतू स्पष्ट होतो. असं सिब्बल यांनी म्हटलं आहेत.

याचवेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हता. आरएसएसची (RSS) विचारसरणी ही भाजपची विचारसरणी आहे. गिरीराज जे काही बोलले त्यावरून सरकारचा हेतू दिसून येतो. ही विचारसरणी गांधीजींच्या आचरणाविरुद्ध आहे. तसे असेल तर सर्व मारेकरी भारतमातेचे पुत्र आहेत. निर्भयाचे मारेकरीही भारताचेच सुपुत्र होते. एकीकडे मोदीजी म्हणतात की आम्ही गांधीजींच्या मार्गावर चालतो आणि त्यांचे मंत्री गांधींजींच्या मारेकऱ्यांना सुपुत्र म्हणत आहेत, अशी सणसणीत टिका त्यांनी केली आहे.

Kapil Sibal News
Pradeep Kurulkar News: प्रदीप कुरुलकरला जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न; संभाजी ब्रिगेडचा आरोप

खुनी कधीही देशाचा सुपुत्र होऊ शकत नाही. खुन्यात धर्म पाहू नये. हाच का सबका साथ और सबका विकास, असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. तसेच, गिरीराज सिंह यांच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी टीका केली पाहिजे, पण ते तसे करणार नाहीत याची मी खात्री देतो. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (National Politics)

काय म्हणाले होते गिरीराज सिंह ?

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी शुक्रवारी (9 जून) छत्तीसगडमधील कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकरी नथुराम गोडसेंना देशाचा सुपुत्र असं संबोधलं होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाबाबत केलेले वक्तव्य आणि त्यावर AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर गिरीराज सिंह बोलत होते.

Kapil Sibal News
Ambadas Danve On Aurangjeb News : औरंगजेबाच्या कबरीचा `संरक्षित स्मारकाचा` दर्जा काढून दाखवा..

वृत्तसंस्था ANI ने गिरिराज सिंह यांचाय व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते "गांधींचा मारेकरी असले तरी नथुराम गोडसेही भारताचे सुपुत्र आहेत.त्यांचा जन्म भारतात झाला. ते औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते. असंही त्यांनी म्हटलं होते.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sanjay Singh, Anant Vikram Singh
MLA Anant Singh's daughter Shivangi's grand wedding
Kapil Sibal
kapil sibbal