Shivsena News : "श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) यांनी निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता होऊन चुकीचा संदेश देऊ नये", अशा भाषेत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी वनगा यांना खडसावलं आहे.
शिवाय एखादी जागा निवडून येणार नसेल तर त्या ठिकाणचा उमेदवार बदलला जातो, असं स्पष्टीकरणही कदम यांनी दिलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघाची (Palghar Vidhan Sabha Constituency) उमेदवारी न मिळाल्याने आमदार श्रीनिवास वनगा प्रचंड दुखावले आहेत.
त्यांनी आपला विश्वासघात झाला असून शिंदेंनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं म्हणत उघड नाराजी वक्त केली आहे. तसंच त्यांनी शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देव माणूस असल्याचंही म्हटलं होतं. वनगा यांच्या याच सर्व वक्तव्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे.
दापोलीमध्ये पत्रकारांशी बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) काय म्हणाले, "एखादी जागा निवडून येणार नसेल तर तिथला उमेदवार बदलला जातो. श्रीनिवास वनगा यांनी निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता होऊन चुकीचा संदेश देऊ नये. त्यांनी परत यावं.
लोकसभा निवडणुकीत आपले अनेक उमेदवारांचा पराभव झाला तरी देखील त्यांना विधानपरिषद दिली. तुम्हालाही देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. उमेदवारी मिळाली नाही म्हणून हे राक्षस आणि ते देव म्हणणं चुकीचं आहे."
तर यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "राज्यात शिवसेनेचे किमान 70 आणि महायुतीचे जवळपास 175 ते 200 आमदार निवडून येतील असा मला विश्वास आहे. तसंच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील.
मी पक्षाचा स्टार प्रचारक असून राज्यात किमान 40 सभा घेऊन पक्षाला लागेल ती मदत करणार. उद्धव ठाकरेंकडे उमेदवार नसल्यामुळे त्यांना काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार उभे करावे लागले. त्यांनी चाळीस आमदारांना बदनाम करण्यापेक्षा मुख्यमंत्रिपद का गेलं? याचं आत्मपरीक्षण करायला हवं, आमदारांना बदनाम करण्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. निकालानंतर त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल", असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.