Shinde Government: सरकारने 'साखरसम्राटां'साठी उघडली तिजोरी,कोट्यवधी रुपयांची खैरात; मुंडेंवर नाराजी?

Shinde Government fund to Sugar Factory : साखर कारखानदारांसाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आपली तिजोरी उघडली असून तब्बल 1200 कोटी रुपयांची खैरात केली आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही महिन्यांपूर्वी सांगली,सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करत राजकारण तापवले होते. मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या ही राजू शेट्टींची मागणी होती. मात्र,शेट्टींच्या तीव्र आंदोलनानंतरही साखर कारखानदारांनी हात वर केले होते. पण आता याच साखर कारखानदारांसाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आपली तिजोरी उघडली असून तब्बल 1200 कोटी रुपयांची खैरात केली आहे.

शिंदे सरकार सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यावर मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे.कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच एनसीडीसीकडून सत्ताधारी पक्षाच्या साखर कारखानदारांना तब्बल 1181.81 कोटींची थकहमीच्या रुपात खैरात केली आहे.यात हर्षवर्धन पाटील, नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.मात्र,यात भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या कारखान्याला या मदतीतून डावलण्यात आले आहे.यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Kolhapur Politics : मी अमित शाह यांना भेटलो; पण... : खासदार मंडलिकांनी मौन सोडलं

हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्यांना एकूण 225 कोटी रुपयांची थकहमी मिळाली आहे. त्यात कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्याला 150 कोटी तर त्यांच्याच मालकीच्या नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी रुपयांची थकहमी देण्यात आली आहे.तर अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्यासाठी 147.79 कोटींची थकहमी देण्यात आली आहे.

याचवेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला 126.38 कोटी रूपयांची थकहमी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते धनाजीराव साठेंच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.याचवेळी अमरसिंह पंडित, कल्याण काळे , प्रशांत काटे यांच्यासह इनेक नेतेमंडळींच्या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मात्र, या थकहमीच्या खैरातीपासून दूर वंचित ठेवण्यात आले आहे. एकीकडे नुकत्याच पक्षात केलेल्या नेत्यांना थकहमी देण्यात येत असतानाच दुसरीकडे वैद्यनाथ साखर कारखान्याला या मदतीपासून दूर ठेवल्यामुळे भाजप नेत्यांची मुंडेवरील नाराजी काय असल्याचे संकेत जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी सरकारच्या या निर्णयावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आता कुठे तोट्यातून सावरत असतानाच अशाप्रकारे थकहमीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची खैरात केल्यामुळे बँक परत एकदा रसातळाला जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Pawar invited CM-DCM : शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com