Pawar invited CM-DCM : शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण

Baramati Namo Rojgar melava : नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी (ता. २ मार्च) बारामतीत येत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बारामतीत येत आहेत
Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना गोविंद बागेत जेवणाचे निमंत्रण दिले आहे. गेल्या काही महिन्यांतील घडामोडी पाहता पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे दिलेले निमंत्रण चर्चेचा विषय ठरले आहे.

नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी (ता. २ मार्च) बारामतीत येत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बारामतीत (Baramati) येत आहेत, त्यामुळे पवार यांनी हे निमंत्रण दिले आहे, तसे त्यांनी आपल्या निमंत्रणाच्या पत्रात नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Shinde-Fadnavis-Pawar Government: बळीराजासाठी खूष खबर! राज्य सरकारचे दिवाळीआधीच आणखी एक 'गिफ्ट'
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

पत्रात शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे, आपण शासकीय दौऱ्याच्या निमित्ताने येत्या शनिवारी (ता. २ मार्च) बारामतीत येत असल्याचे समजले. संबंधित कार्यक्रमाला संसद सदस्या या नात्याने मला आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उपस्थित राहायला आवडेल. मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या विद्यानगरी, बारामती येथील मैदानावर ता. २ मार्च रोजी हा मेळावा होणार आहे. या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात स्वागत करू इच्छितो.

विद्या प्रतिष्ठानच्या, विद्यानगरी येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपल्याला निमंत्रित करीत आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बारामती शहरात येत आहात. याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग’ या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्याव, असे मी आपणांस दूरध्वनीवरून यापूर्वीच निमंत्रित केले आहे. नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा स्वीकार करावा. दोन्ही सस्नेह आमंत्रणाचा आपण स्वीकार कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Kolhapur Politics : मी अमित शाह यांना भेटलो; पण... : खासदार मंडलिकांनी मौन सोडलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही शरद पवार यांनी गोविंद बागेतील जेवणाचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असेही म्हटले आहे. पवार यांच्या निमंत्रणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे.

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Maharashtra Budget session : जयंतरावांनी दिलेला मोलाचा सल्ला अजितदादा मानणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com