Stray Dog Terror : भटक्या कुत्र्यांची दहशत , 6 तासांत तब्बल 125 जणांना चावा; नगरसेवक, पोलिस घेतायेत शोध

Stray Terror Dog KDMC: अवघ्या सहा तासांमध्ये 125 जणांचा भटक्या कुत्राने चावा घेतला.यातील 11 वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.
stray dog terror 125 people bitten
stray dog terror 125 people bittenSarkarnama
Published on
Updated on

Stray dogs bite 125 people in 6 hours: केडीएमसी हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या आणि दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी कल्याण पश्चिम परिसरात अवघ्या सहा तासांत तब्बल १२५ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेलपासून आधारवाडी परिसरापर्यंत रविवारी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत भटक्या कुत्र्यांनी सुमारे १२५ नागरिकांना चावा घेतला. जखमी नागरिकांनी उपचारासाठी केडीएमसीच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्या ११ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य जखमींवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच परिसरात अवघ्या सहा तासांत एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दहशतीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

stray dog terror 125 people bitten
Maharashtra News Live Update : गिरीश महाजन यांच्या बदनामी प्रकरणी पुणे जिल्ह्यातून एकाला अटक

नगरसेवक, पोलिसांकडून शोध

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक घाबरले आहेत. भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. तसेच परिसरातील नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक देखील कुत्र्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खडकपाडा पोलिस ठाणे तसेच महात्मा फुले पोलिस ठाणे यांच्या पथकाकडून शोध सुरू आहे.

stray dog terror 125 people bitten
Pune News: पुणे शहरात वर्षभरात कुत्र्यानं चावा घेतल्याच्या तब्बल 30 हजार घटना; महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर, तब्बल 25 लाख खर्च करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com