BJP Vs Shivsena : खासदारांच्या गाडीतून फिरताना गळचेपी दिसली नाही का ? भाजप आमदार गायकवाडांवर शिंदे गटाचा निशाणा

Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीत भाजप-शिवसेनेत (शिंदे गट) वादाची ठिणगी ?
Ganpat Gaikwad and Dipesh Mhatre
Ganpat Gaikwad and Dipesh MhatreSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता-पुत्र हे भाजप पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करत असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) युवासेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी आमदार गायकवाड यांच्यावर पलटवार केला आहे.

"खासदारांच्या गाडीत बसून भूमिपूजन कार्यक्रम करत फिरत होते, तेव्हा यांना गळचेपी दिसली नाही का ? बोलताना आपण काय बोलतोय, याचे तारतम्य बाळगले पाहिजे, असा टोला लगावत म्हात्रे यांनी आमदार गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. यामुळे आता कल्याणमधील भाजप-शिंदे गटातील राजकीय वाद डोंबिवली पश्चिमेला पोहोचला असून, पुढे हा वाद कोणते वळण घेतो, हे पाहणेदेखील महत्त्वाचे असणार आहे.

Ganpat Gaikwad and Dipesh Mhatre
Anil Parab News : जरांगेच्या उपोषणावर अनिल परबांचे प्रश्नचिन्ह : नव्या वादाला तोंड फुटलं; म्हणाले, "मराठवाड्यातील मराठ्यांना..."

महापौर आमचाच बसेल, असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. त्यानंतर मनसे आमदारांनी भाजप-शिंदे यांच्या सांगण्यावरून चालतं. हे काय महापौर बसवणार ?, यांनी आधी मानपाडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक बसवून दाखवावा, असे म्हणत डिवचले होते.

यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मनसे आमदार राजू पाटील यांची बाजू घेत शिंदे पिता-पुत्रांकडून भाजप पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात आहे, असा खळबळजनक आरोप केला. आमदार गायकवाड यांच्या याच आरोपाला आता शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले.

दीपेश म्हात्रे यांनी भाजप नेत्यांना सल्ला दिला आहे. काही लोकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसेल, असे विधान केले होते. शिवसेना-भाजप अनेक वर्षांपासून युतीमध्ये आहे, राज्यातदेखील युतीचे सरकार आहे. प्रत्येक माणसाने वक्तव्य करताना आपण काय वक्तव्य करतोय, याचे तारतम्य बाळगले पाहिजे, असे म्हणत म्हात्रे यांनी भाजप नेत्यांना सल्लाच दिला.

पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाले आहेत. या शहरांमध्ये एवढी वर्षं कामं होत नव्हते. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे आल्यानंतर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम होत आहेत. एक सुशिक्षित राजकारणी आम्हाला मिळाला असं बोलताहेत.

शिवसेना म्हणून लोकांसमोर विकासाचा दृष्टिकोन घेऊन जाणार आहे. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. येणाऱ्या काळात जनता ठरवेल, या शहरांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसेल, कोणाचा महापौर बसेल. राजकारण्यांनी यावर चर्चा न केलेले बरे, आपण आपलं काम घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले.

तसेच हीच लोकं काही दिवसांपूर्वी खासदारांच्याच गाडीत बसून भूमिपूजन करत होते. कल्याण पूर्वेत खासदारांना घेऊन फिरत होते. तेव्हा यांना गळचेपी दिसली नाही का ?, असा सवाल करत सगळ्यांनी अशी वक्तव्यं आता बंद करायला पाहिजेत, असे म्हात्रे म्हणाले.

Edited by - Ganesh Thombare

Ganpat Gaikwad and Dipesh Mhatre
Chandrababu Naidu Arrested: चंद्राबाबू नायडूंची हायकोर्टात धाव; बेल की पुन्हा जेल ? बुधवारी होणार फैसला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com