Maharashtra Politic's : सुनील तटकरेंचा गोगावलेंवर पलटवार; म्हणाले, ‘मी काही छोटा नाही, पाच वेळा विधानसभा, दोनदा लोकसभा जिंकलीय...’

Bharat Gogawale Vs Sunil Tatkare : लोकसभेला केलेल्या मदतीची काहींनी जाणीव ठेवली नाही. उलट माझ्या पराभवासाठी महायुतीच्या काही नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते. पण मायबाप मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडणूक जिंकलो आणि मंत्रीही झालो.
Bharat Gogawale-Sunil Tatkare
Bharat Gogawale-Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 14 August : शिवसेनेचे राजीव साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशानंतर रायगडमध्ये हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पालकमंत्रिपदाचा वाद अगोदरच चिघळलेला असतानाच साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने संतापलेल्या शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. खुद्द रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी ‘सुनील तटकरे यांनी आता उलटी गणती सुरू करावी’ असे आव्हान दिले आहे. त्याला तटकरे यांनी चोख उत्तर दिले आहे.

रायगडमधील माणगाव येथे शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, लोकसभेला काही पक्षाचा एकही खासदार निवडून आला नाही. आम्ही रायगडमध्ये मदत केल्यामुळे सुनील तटकरे निवडून आले. मी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, रवीशेठ आणि योगेश कदम नसते, म्हणजे आम्ही थोडीजरी मान वाकडी केली असती ना त्यांना मिळालेले ८२ हजार मतांचे लीड कुठल्या कुठे वाऱ्यासारखे उडून गेले असते.

लोकसभेला केलेल्या मदतीची काही लोकांनी जाणीव ठेवली नाही. उलट माझ्या पराभवासाठी महायुतीच्या काही नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते. पण मायबाप मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडणूक जिंकलो आणि मंत्रीही झालो, असेही गोगावले यांनी सांगितले हेाते. शिवसेनेचे मंत्री गोगावले यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पलटवार केला आहे.

Bharat Gogawale-Sunil Tatkare
Raj Thackeray : मध्यस्थीची मागणी करणाऱ्या जैन मुनीला राज ठाकरेंनी सुनावलं, 'कोर्टाचा निर्णय...'

रोहयो मंत्री गोगावले यांच्या टीकेला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी ‘कोण काय बोलतंय, त्यावर प्रतिक्रिया देण्याइतपत मी काही छोटा नाही,’ असे म्हणून त्यांनी गोगावले यांना आपण मोठा नेता मानत नसल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.

Bharat Gogawale-Sunil Tatkare
Nashik Guardian Minister : कोण म्हणतं काहीच फरक पडत नाही? पालकमंत्री नसल्यानं नाशिकचं होतय नुकसानच नुकसान

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. मी रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच, पाच वेळा विधानसभेचा आमदार म्हणून, तर दोनवेळा लोकसभेवर निवडून आलो आहे. एकदा महायुतीमधून, तर एकदा महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक मी जिंकलो आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्याचे काम मी करत आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com