Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांच्या निशाण्यावर मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आहेत. मुक मोर्चामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. मात्र, नंतर दिलगिरी व्यक्त केली. धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून अमोल मिटकरी उत्तर देत आहेत. जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर केला आहे.
मिटकरी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुरेश धस म्हणाले, 'मिटकरी स्वतः बोलत नाही. कोणीतरी बोलायला लावत आहे. जो कोणी बोलायला लावतोय त्याला मी उत्तर देईल. राष्ट्रवादीमधील वरिष्ठ, बड्या मुन्नी बोलायला लावत आहे. अमोल मिटकरी, सुरज चव्हाण या बारकाल्या बारकाल्या पोरांना का बोलायला लावती. त्या मुन्नीने पुढं यावं. मुन्नी पुढं आली तर मी तिची सुन्नी करतो.'
'मिटकरी आरोप जे करताये ते ते दुसरी तिसरीच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत. त्यांना एक दोन वेळा मी समज दिली आहे की माझ्यावर बोलू नका. मी चड्डीत असल्यापासून म्हणजे चौथीपासून आत्तापर्यंत माझी चौकशी करा. त्या चौकशीमध्ये काही सापडणार नाही.', असे देखील सुरेश धस म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून लक्ष विचलीत करायचे प्रयत्न सुरू आहेत. मिटकरी, त्यांचा पक्ष खून करणाऱ्यांना पाठीबा देतोय का? राष्ट्रवादी खूनाच्या पाठींबा देतात का? असा सवाल सुरेश धस यांनी विचारला. तसेच अमोल मिटकरी याला तेरेनाम झाल्याला दिसतोय. कोणत्या प्रकरणात कशाचा काय सुरू आहे याचा मिटकरीला ताळमेळ आहे का? त्याचा तेरे नाम झालाय, असा टोलाही धस यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.