Sushma Andhare : अंधारेंना अमृता वहिनींची काळजी..फडणवीसांना दिला 'हा' सल्ला

Sushma Andhare : सत्तेसाठी शिवसेनेने हट्टाहास केला नाही,
Sushma Andhare latest news
Sushma Andhare latest newssarkarnama
Published on: 
Updated on: 

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या फ्रायरबँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. अंधारे या काल (शुक्रवारी) गोंदिया येथे बोलत होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. अंधारे यांनी फडणवीसांवर टीका करीत एक सल्लाही दिला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी बसा. हवं तर आमच्या अमृता वहिनींच्या गाण्याचं प्रमोशन करा.कारण माझ्या भावजयीची काळजी मी नाही करणार तर कोण करणार, मला त्यांची प्रचंड चिंता आहे,"

Sushma Andhare latest news
Kurhani By-Election 2022 : मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताच बेरोजगार तरुणांचा राडा ; खुर्च्यां फेकल्या..

"आमच्या नेतृ्त्वाचा आम्हाला धाक असल्यामुळे मी खूप संयमी वागण्याचा प्रयत्न करते.कारण आम्हाला नेतृत्वाने सांगितले की फक्त महाराष्ट्राच्या विकासावर बोललं पाहिजे," असा टोला अंधारे यांनी विरोधकांना हाणला.

"राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या गैरवापर करुन भाजप स्थानिक पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपला फक्त शिवसेना संपवायची नाही, तर देशातील सर्व पक्ष संपवायचे आहेत, लोकशाही टीकवण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत प्रबळ विरोधी पक्षही असला पाहिजे. उद्धव ठाकरेंची कुठलाही आक्रताळेपणा न करता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ,सत्तेसाठी शिवसेनेने हट्टाहास केला नाही,"असे अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare latest news
Ganesh Naik : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या आमदाराला मोठा दिलासा

सुषमा अंधारे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांच्यात मागील काही दिवसांपासून ‘व्हिडीओ वॉर’ सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांचे जुने व्हिडीओ शेअर करत एकमेकांवर टीका करत आहेत. अलीकडेच नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये सुषमा अंधारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत. यानंतर सुषमा अंधारे आणि नितेश राणे यांच्यात ‘व्हिडीओ वॉर’ सुरू झाला आहे. दोन्हीही वार-पलटवार करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.