Andhare vs Shirsat : शिरसाटांना ते वक्तव्य भोवणार? सुषमा अंधारेंची तक्रार अन् महिला आयोगाने दिले थेट 'हे' आदेश

MLA Sanjay Shirsat : सुषमा अंधारेंची महिला आयोगात तक्रार; महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
 MLA Sanjay Shirsat and Sushma Andhare
MLA Sanjay Shirsat and Sushma AndhareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर अर्वाच्च भाषेत टिका केली होती. यावरु आता राजकारण तापलं आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेच या तक्रारीची महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे.

याबाबत महिला आयोगाने ट्वीट करत या प्रकरणी योग्य ती चौकशी करून चौकशीचा अहवाल ४८ तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा, अशा सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 MLA Sanjay Shirsat and Sushma Andhare
Andhare vs Shirsat : गेली उडत आमदारकी, जास्त बोलायला लावू नका; संजय शिरसाटांचा इशारा!

काय आहे महिला आयोगाचं पत्र?

''छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेत बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत अर्वाच्च भाषेत टीका केली याबाबतची तक्रार महिला आयोगाकडे अंधारे यांनी दाखल केली आहे.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलेचा अपमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. सुषमा अंधारे या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा अर्वाच्च भाषेचा वापर होणे ही गंभीर बाब आहे. याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे, असं ट्वीट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले आहेत. या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासांत राज्य महिला आयोगाच्या कार्यालयास पाठविण्यात यावा, अशा सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.