Sushma Andhare News : फडणवीसांच्या 'त्या' विधानावर अंधारेंचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या,''11 ते 13 मे दरम्यान...''

Political News : फडणवीसांच्या उठाठेवीमुळे पक्षाची इमेज खराब झाली...
Devendra Fadanvis | Sushma Andhare
Devendra Fadanvis | Sushma AndhareSarkarnama

Mumbai : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतच असतो. कसा येतो हे तुम्हांला माहीत आहे असं विधान केलं होत. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याचवेळी आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या विधानावरुन मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी येत्या 11 ते 13 मे दरम्यान राज्यात काय होईल ते सांगता येणार नाही. तसेच डिनर डिप्लोमसीनंतर फडणवीस यांना धक्का लागला तरी आश्चर्य वाटणार नाही असा सूचक वक्तव्य अंधारे यांनी केलं आहे.

Devendra Fadanvis | Sushma Andhare
Devendra Fadanvis News: 'मी पुन्हा येईन'चा परत एकदा नारा आणि तोही फडणवीसांकडूनच..! राजकीय चर्चांना उधाण

अंधारे काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde)यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यातील सत्ता बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर मिळाला. पण ही भेट स्नेहभोजनासाठी होती असंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या भेटीवर मोठं विधान केलं आहे.

राज्यपालांकडे डिनर डिप्लोमसीला जाऊन आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. या घडामोडीतून बरेच राजकीय संकेत येत आहेत. येत्या 11 ते 13 मे दरम्यान राज्यात काय होईल ते सांगता येणार नाही. डिनर डिप्लोमसीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला तरी आश्चर्य वाटणार नाही असं अंधारे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadavis) पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फडणवीसांच्या उठाठेवीमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे. एकनाथ शिंदेशी हातमिळवणी केल्यामुळे पक्षांची इमेज खराब झाली आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Devendra Fadanvis | Sushma Andhare
Abhijeet Patil Join NCP : 'विठ्ठल'चे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

ते पुन्हा आले पण...

फडणवीस पुन्हा येईन म्हटले होते. ते आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले. फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट इथे सक्रिय आहे. त्यामुळे फडणवीस पुढील काळात येतील पण विरोधी पक्षांचे नेते म्हणून, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com