Nanaware Family Death Case: आरोपींवर तत्काळ कारवाई करा; ननावरे दाम्पत्याच्या कुटुंबियांची मागणी

Mumbai Crime News: माजी आमदार कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली.
crime News
crime News Sarkarnama

Ulhasnagar News : माजी पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ननावरे यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत अनेक तर्कवितर्क काढण्यात येत असतानाच आत्महत्या पूर्वी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ समोर आला होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी फिर्याद घेत संग्राम निकाळजे सह त्याच्या साथीदारांना आरोपी केले होते. अखेर चार दिवसानंतर अंत्यविधी आटोपून नंदू ननावरे यांचे भाऊ तसेच त्याचा चालक आणि मानलेली बहीण यांनी पोलीस ठाणे गाठत जबाब नोंदवत आरोपींवर तात्काळ गजाआड करण्याची मागणी केली आहे.

crime News
Mantralay Threat Call: मंत्रालय अतिरेकी हल्ला धमकी प्रकरणी एकाला अटक; आजच कोर्टात...

नंदकुमार ननावरे यांनी पत्नी उज्वला यांच्यासह मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी हा व्हिडीओ पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व त्यांच्या निवडक सहकाऱ्यांना पाठवला होता. तसेच आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या खिशात एक चिट्ठीही मिळाली होती.

crime News
Ravikant Tupkar PC : मी 'स्वाभिमानी'तच राहणार: नाराजीच्या चर्चांवर तुपकर थेट बोलले

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे दापत्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी दाखल केली होती. घटनेच्या दिवशी ननावरे कुटुंबीय हे साताऱ्याला असल्याने रात्री उशिरा घेऊन गावाला निघून गेले होते. या प्रकरणात अंत्यविधी करून झाल्यावर येऊ आणि फिर्याद देऊ असे ननावरे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते.

चार दिवसानंतर नंदू ननावरे यांचे भाऊ धनंजय ननावरे यांनी आज दुपारी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यासह नंदू ननावरे यांचे चालक, त्यांची मानलेली बहीण आणि सुरक्षेसाठी नंदू ननावरे यांना देण्यात आलेला शासकीय पोलीस कर्मचारी हे होते. त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार या जबाबात षडयंत्र रचणारे उल्हासनगर शहरातील काही नामांकित व्यक्तींच्या कश्याप्रकारे सहभाग आहे, त्याची इतंभुत माहिती देण्यात आली आहे. यावेळी धनंजय ननावरे यांनी विठ्ठलवाडी पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले. तसेच लवकरात लवकर माझ्या भावाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com