अनिल देशमुख हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार? तब्बल एक वर्ष एक महिन्यानंतर होणार सुटका

Anil Deshmukh News : देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी न्यायालयाने फेटाळली.
Anil Deshmukh News
Anil Deshmukh NewsSarkarnama

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) यांना उच्च न्यायालयाचा (High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी न्यायालयाने फेटाळली.

मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार होती. याचसंदर्भात सीबीआयने जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात आज न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयने केली होती. मात्र, जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि देशमुखांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.

Anil Deshmukh News
Sushma andhare : सुषमा अंधारेंचं आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारणार का?

काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती दिली होती. देशमुख यांची १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी आर्थररोड तुरुंगातून सुटका होणार आहे. अनिल देशमुख हे उद्या तुरुंगातून बाहेर येतील, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळूनही देशमुखांना तुरुंगातच राहावे लागले होते. अखेर आज न्यायालयाने जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.

Anil Deshmukh News
Dhananjay Munde : अजितदादांनी सुनावताच धनंजय मुंडेंनी तो निर्णय बदलला...

देशमुखांना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याता आला आहे. त्यावेळी न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार, देशमुखांना त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा लागणार आहे. तपास यंत्रणा व न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच, आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार. याशिवाय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तपासात संपूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देश देशमुखांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com