Tejas Thackeray News: मुंबईतील झेन-जीच्या आंदोलनात 'ग्रँड एन्ट्री'; तेजस ठाकरेंनी आता मोदी सरकारमधील मंत्र्यालाच लिहिलं पत्र, मोठी मागणी समोर

Shivsena UBT News: उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तेजस ठाकरे हे झेन-जीच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा थांबलेली नाही. यानंतर त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. तेजस ठाकरे यांनी आता थेट केंद्र सरकारलाच पत्र लिहित मोठी मागणी केल्याचं समोर येत आहे.
tejas, uddhav, aditya thackeray
tejas, uddhav, aditya thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत शिवाजी पार्कवर मोठं आंदोलन करण्यात आलं होतं.त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेना भवनासमोर छावणीचं स्वरूप आलं होतं.या मुंबईतील आंदोलनाच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची पहिल्यांदाच आंदोलनात ग्रँड एन्ट्री झाली होती. या एन्ट्रीनंतर आता तेजस यांनी थेट मोदी सरकारमधील एका मंत्र्यालाट पत्र लिहिल्याची माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तेजस ठाकरे हे झेन-जीच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा थांबलेली नाही. यानंतर त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. तेजस ठाकरे यांनी आता थेट केंद्र सरकारलाच पत्र लिहित मोठी मागणी केल्याचं समोर येत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या या पत्रामुळे हळूहळू त्यांची पावले राजकारणाच्या दिशेनं पडण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे.

तेजस ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात पश्चिम बंगालमधील चेल नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या दुर्मिळ बोर्ना स्नेकहेड पाळीव प्राणी व्यापारासाठी अवैधपणे शिकार केली जात असल्याचा गंभीर आरोप पत्राद्वारे केला गेला आहे.

tejas, uddhav, aditya thackeray
Delhi Tiranga March: 'सीजेपी'च्या 'लहरा दो तिरंगा' मार्चला मोठा धक्का, NDMC चा सेंट्रल पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय, अभिजीत दिपके संतापले

सरकारने दुर्मिळ बोर्ना स्नेकहेड माशाच्या तस्करीच्या मुद्यावर सरकारने लक्ष द्यावे यासाठी, तेजस ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिलं आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत सर्वोच्च संरक्षण देण्याची तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.  

तेजस ठाकरे यांच्या पत्रात त्यांनी दुर्मिळ बोर्ना स्नेकहेड माशाचा शोध ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन संशोधकांनी 2025 मध्ये लावल्याचं म्हटलं आहे. मात्र, या माशाच्या वाढत्या तस्करीमुळे बोर्ना स्नेकहेडला गंभीर धोका असल्याचा उल्लेख करण्यात आल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com