Thackeray Group: पालिका अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण ठाकरे गटाला भोवणार? फडणवीसांनी दिला थेट कारवाईचा इशारा

Thackeray Group Beat BMC Officer: मुंबई पालिकेतील अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण
Thackeray Group Beat BMC Officer
Thackeray Group Beat BMC OfficerSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पालिकेतील अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार आज घडला. मुंबईच्या वांद्रे परीसरातील ठाकरे गटाची शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शाखेवर कारवाई केली होती.

तर या कारवाई वेळी शाखेतील बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढू न दिल्याचा दावा शिवसैनिकांनी केला. यावरूनच आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण आता ठाकरे गटाला भोवण्याची शक्यता आहे.

मुंबई पालिकेतील अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच मारहाण केल्याचा प्रकार घडला. यानंतर काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, आता या मारहाणीच्या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. "कायदा कोणी हातात घेतला तर शंभर टक्के कारवाई होणार", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Thackeray Group Beat BMC Officer
Thackeray Group: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या वांद्रे परीसरातील ठाकरे गटाची शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत शाखेच्या बांधकामावर जेसीबीने कारवाई करण्यात आली होती. या कारवाई वेळी शाखेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते, ते फोटो काढू न दिल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आता करण्यात आला आहे.

यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट पालिकेत जाऊन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, आता या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Thackeray Group Beat BMC Officer
Gunratna Sadavarte On State Transport Bank Victory : स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेच्या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

अनिल परब काय म्हणाले?

"अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत आमचं काहीच म्हणणं नाही. पण ज्या शाखेवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. त्या शाखेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. कारवाई करताना आमचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना सांगत होते, या आम्हाला वेळ द्या. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्याने थेट हातोडा चालवला.त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले, असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.