Vidhan Parishad Election : तुमच्या विधान परिषद उमेदवारीबाबत ठाकरेंची भूमिका काय?; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य...

Mahavikas Aghadi : आम्ही इंडिया आघाडीचे तीन उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहत आहोत आणि ते निवडून येण्यासाठी आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे.
Jayant Patil-Uddhav Thackeray
Jayant Patil-Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai, 02 July : विधान परिषदेच्या अकरा जागांपैकी विधानसभेतील संख्याबळाप्रमाणे महायुतीला नऊ, तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी स्वतःची उमेदवारी घाेषित केली आहे. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाची (Thackeray Group) भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. शिवाय ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा अर्ज भरणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्याबाबत शिवसेनेकडून अजूनही कुठलेही भाष्य करण्यात आलेले नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुमच्यावर नाराज आहेत का? कारण त्यांनी तुम्हाला पाठिंबा देण्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही, असा प्रश्न विचारला असता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरे तुमच्यावर अजूनही नाराज आहेत का? ते तुम्हाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर बोलले नाहीत, असं विचारताच पाटील म्हणाले, ‘थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येतील आणि काय ते तुम्हाला कळेलच’

पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता ठाकरे हे पाटील यांनाच पाठिंबा देणार का? की मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.

Jayant Patil-Uddhav Thackeray
Malaysia Parcel Case : कागलचं राजकारण ढवळून काढणाऱ्या त्या ‘पार्सल’चं पुढं काय झालं?

आमचं गणित पक्क : जयंत पाटील

विधान परिषदेचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी शेकापचे नेते विधिमंडळात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले ‘आम्ही इंडिया आघाडीचे तीन उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहत आहोत आणि ते निवडून येण्यासाठी आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. आमचं निवडून येण्याचं गणित पक्क आहे. आघाडीची मतं आणि समान वाटून घेणार आहोत.’

दरम्यान या वेळी त्यांनी इंडिया आघाडीकडे एकूण 63 नव्हे; तर 69 मते असल्याचा दावाही केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अधिकची मतं इंडिया आघाडी नेमकी कुठून आणणार, या चर्चाना उधाण आलं आहे.

Edited By : Vijay Dudhale

Jayant Patil-Uddhav Thackeray
Prashant Paricharak : विधान परिषदेत डावलले; प्रशांत परिचारक विधानसभेला मोहिते पाटलांप्रमाणे धाडस दाखवणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com