Maharashtra Politic's : महाआघाडीला मोठा धक्का; महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे सेनेची घोषणा

Shivsena Leader Sanjay Raut Announcement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray-Shivsena UBT
Uddhav Thackeray-Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 11 January : महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचं आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं तसं ठरतंय, असे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही घोषणा केली आहे. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या) निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्यात आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.

विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जागा वाटपाच्या वाटाघाटीमध्ये खूप वेळ वाया घालवला, असे विधान केले होते. त्यावर राऊत म्हणाले, वडेट्टीवार काय बोलतात, त्याकडे फारसे लक्ष द्यायची गरज नाही.. हरयाणामध्ये आम्ही होतो का? तिथे काँग्रेस पक्षासमोर कोणीच नव्हतं. मग काँग्रेसचे ते का हरली. जम्मू-काश्मीरला का पराभूत झाली.

Uddhav Thackeray-Shivsena UBT
Walmik Karad : वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा अडचणीत; रिव्हॉल्वरच्या धाकाने लूट, सोलापुरात फिर्याद दाखल

महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री होण्यासाठी, त्यात आम्ही नव्हतो, असा टोला त्यांनी नाव न घेता नाना पटोले यांना लगावला. शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. अख्या देशभरात तुमचा पराभव का होत आहे. सर्वत्र संजय राऊत आहे का? विजय वडेट्टीवारही वाटाघाटीच्या बैठकीत उपस्थित होते. आघाडीमध्ये जो आघाडीची भूमिका स्वीकारत नाही, त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो, असा पलटवारही राऊतांनी केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीची स्थापन केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray-Shivsena UBT
BJP Politic's : सुधीरभाऊंच्या चंद्रपूरमधील अनुपस्थितीचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले कारण...

लोकसभा निवडणूक होऊन एवढे महिने झाले तरी इंडिया आघाडीची अजून एकही बैठक झाली नाही. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील सर्वात मोठा पक्ष आहे, बैठक बोलावण्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे. मात्र, अजून एकही बैठक होऊ शकलेली नाही, अशी खंतही संजय राऊत यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com