Walmik Karad : वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा अडचणीत; रिव्हॉल्वरच्या धाकाने लूट, सोलापुरात फिर्याद दाखल

Solapur Crime News : सुशील कराडने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने घरातून उचलून नेत तिच्या पतीकडून दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी व पीडितेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे याच्या नावावर पैसे न देता खरेदी केला.
Sushil Karad-Walmik Karad
Sushil Karad-Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 January : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा आरोप असलेला वाल्मिक कराडला बीड एसआयटीने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हासुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुशील कराडने त्याच्याकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्याला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीर ताब्यात घेतल्याची खासगी फिर्याद सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली आहे.

सुशील वाल्मीक कराडसह (Sushil Walmik Karad) त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खासगी फिर्याद दाखल केली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलिस ठाणे, सोलापूर पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली

त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. सुशील कराडवर केलेल्या आरोपबाबत सोलापूर (Solapur) जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबतची माहिती अशी की, मूळचे सोलापूर येथील महिला, तिचा पती आणि दोन मुलांसह परळी येथे राहायला होते. संबंधित महिलेचा पती हा सुशील वाल्मिक कराड याच्या ट्रेडर्समध्ये कामाला होता. सुशील कराड याने तिच्या पतीला दोन बल्कर ट्रक, दोन कार आणि जागा कसं काय कमावला; म्हणून मारहाण केली.

Sushil Karad-Walmik Karad
BJP Politic's : सुधीरभाऊंच्या चंद्रपूरमधील अनुपस्थितीचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले कारण...

सुशील कराड याने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने घरातून उचलून नेत तिच्या पतीकडून दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी व पीडितेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे याच्या नावावर कोणतेही पैसे न देता खरेदी केला. तसेच, संबंधित महिलचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिनेही परळीतील बालाजी ज्वेलर्सला जबरदस्तीने विकायला भाग पाडले. त्या दागिन्याचे पैसेही सुशील कराडने घेतले. तसेच तिच्या लहान मुलीला मारहाण केली, अशी फिर्याद पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती.

संबंधित महिलेची एमआयडीसी पोलिसांनी फिर्यादीच घेतली नाही; म्हणून तिने सोलापूरच्या पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. पण, आयुक्तांनीही दखल घेतली नाही. त्यावर महिलेने एमआयडीसी पोलिस ठाणे, सोलापूर पोलिस आयुक्त, सोलापूर व बीड पोलिस अधीक्षक, तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे रजिस्टर पोस्टाने तक्रार केली हेाती. तसेच, तक्रारीच्या अनुषंगाने असलेली कागदपत्रेही पोस्टाने पाठवली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार अर्जाची दखल घेतली नाही

पोलिसांनी दखल न घेतल्याने संबंधित महिलेने सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात खासगी फिर्याद वजा तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सुशील कराड, अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी फिर्यादीत केली आहे.

Sushil Karad-Walmik Karad
Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार महायुतीच्या 237 आमदारांची शिकवणी; मुंबईत साधणार संवाद!

त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागविले आहे, आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून आरोपींचे वकील आज हजर नसल्यामुळे पुढील सुनावणी ही 13 जानेवारी रोजी होणार आहे. पीडित महिलेच्या वतीने ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. श्रीकांत पवार, ॲड. मधुकर व्हानमाने हे काम पाहत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com