Thane Crime News : कार्यालयात पक्षाच्या कामात मग्न असतानाच धाडधाड सात राऊंड फायरिंग..! प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येचा थरारक घटनाक्रम, काय घडलं त्या रात्री?

Pradeep Purnekar murder case full details : ठाण्यात पक्षाच्या कार्यालयात काम सुरू असतानाच प्रदीप पुर्णेकर यांच्यावर सात राऊंड फायरिंग झाल्याची घटना समोर आली. त्या रात्री नेमकं काय घडलं? जाणून घ्या घटनाक्रम.
Pradeep purnekar
Pradeep purnekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

ठाण्यातील मानपाडा परिसरात ठाकरेसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. 29 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता पूर्णेकर हे आपल्या कार्यालयात पक्षाच्या कामासाठी बसले होते. याचवेळी काही हल्लेखोर कार्यालयाजवळ आले आणि त्यांनी पूर्णेकरांवर एकापाठोपाठ 7 गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.

गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. काही कार्यकर्त्यांनी जखमी पूर्णेकरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरीरात 4 गोळ्या लागल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला.

Pradeep purnekar
8th pay commission : ‘पोस्ट एक अन् पे-लेव्हल पण एक...’ मग पेन्शन वेगवेगळी का? 8व्या वेतन आयोगाला कर्मचाऱ्यांचा थेट सवाल! जुना नियम बदलणार?

या प्रकरणात पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे यांना ताब्यात घेतले आहे. संतोष कनोजिया आणि निखिल यादव हे संशयित फरार असल्याची माहिती आहे. याशिवाय आणखी एका अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे पूर्णेकरांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या त्यांच्या मित्रालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पप्या शिंदेने कार्यालयातून हल्लेखोरांना कथितपणे हिंट दिली होती का, याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. शिंदेसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी पूर्णेकरांना धमकी दिल्याचा आरोप त्यांच्या मुलाने आणि भावाने केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

पूर्णेकर हे अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर बांधकामांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांच्या हत्येच्या एक दिवस आधीच्या सोशल मीडिया पोस्टचीही चर्चा सुरू आहे. या पोस्टमध्ये ‘एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल’, असा उल्लेख होता. त्यामुळे त्यांना संभाव्य हल्ल्याची कल्पना होती का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, ठाणे क्राईम ब्रँचकडून 3 महिलांना मिरारोड येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य हल्लेखोर हत्येपूर्वी आणि हत्येनंतर या महिलांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसेच संतोष कनोजिया आणि या महिलांमध्ये हत्येनंतर पैशांची देवाणघेवाण झाल्याचा तपासात उलगडा झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे.

Pradeep purnekar
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मध्यरात्री मोठी घडामोड : FIR मध्ये मिनाक्षी शिंदे अन् राजेंद्र शिंदेंचं नाव

आता प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागचं नेमकं कारण काय, हल्ल्याचा कट कोणी रचला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या हत्येमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com