Maharashtra political News : ठाणे महापालिका भाजप स्वबळावर लढणार, गणेश नाईक लागले कामाला

Thane Municipal Corporation Ganesh Naik vs Eknath Shinde : गणेश नाईक यांनी मंगळवारी एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कोपरी मतदारसंघात जनता दरबार घेण्याची घोषणा केली आहे.
Ganesh Naik vs Eknath Shinde
Ganesh Naik vs Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महापालिका निवडणूक कधी होणार, हे 25 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. त्यामुळे राजकीय पक्षांकडून पालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढच होणार की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार याची चर्चा सुरू आहे. यामध्येच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात ठाणे शहरात घेरण्याची रणनीती भाजप आखत असल्याची चर्चा आहे.

ठाणे महापालिका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे मंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे. गणेश नाईक यांनी मंगळवारी एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कोपरी मतदारसंघात जनता दरबार घेण्याची घोषणा केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या सत्कार समारंभात महापालिकेला फक्त कमळ चिन्हच असे म्हटले. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Local Government Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकराजा’चे ग्रहण मेपर्यंत संपवणे शक्य ; कायदेतज्ज्ञाचा दावा

गणेश नाईक हे ठाण्याचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून आग्रही होते. ठाणे जिल्ह्यात भाजपला 100 टक्के यश मिळाले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजपचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदावर नाईक यांनी दावा केला होता. मात्र, ठाण्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश आले.

लोकसभा निवडणुकीत ठाण्याची जागा भाजपला हवी होती. मात्र, त्या जागेवर एकनाथ शिंदे यांनी आपला दावा कायम ठेवला. भाजपला ठाण्याच्या जागेवरील दावा सोडावा लागला. विशेष म्हणजे गणेश नाईक यांचे पुत्र या जागेवरून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छुक होते.

नाईक यांच्यावर जबाबदारी

गणेश नाईक यांच्यावर भाजपने ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबादर दिली आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये याआधीच वर्चस्वाची लढाई होती. त्यामुळे ही लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Arvind Kejriwal : निवडणूक आयोगाच्या नोटीसला केजरीवाल यांचे उत्तर, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com