Shivsena Vs BJP : घरातील चौघांनाही निवडूण आणण्यासाठी ठाण्यातील शिवसेना नेत्याची फिल्डिंग : कट्टर विरोधक असलेल्या भाजप आमदाराची घरी जाऊन मनधरणी

Thane Municipal Election : विधानसभेत विरोधात असलेले शिंदे सेनेचे संजय भोईर आणि भाजप आमदार संजय केळकर ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटल्याने युतीतील समीकरणांवर राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
Shinde Sena leader Sanjay Bhoir with family meeting BJP MLA Sanjay Kelkar in Thane ahead of municipal elections, signaling possible political coordination despite earlier assembly-level rivalry.
Shinde Sena leader Sanjay Bhoir with family meeting BJP MLA Sanjay Kelkar in Thane ahead of municipal elections, signaling possible political coordination despite earlier assembly-level rivalry.Sarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांना कडवा विरोध करीत त्यांच्या विरोधात निवडणुक लढविण्याची तयारी केली. मात्र, पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने उमेवारी मागे घेतली. अशातच आता ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय भोईर यांनी कुटुंबासह भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होत आहे. अशातच ठाणे पालिकेत देखील घराणेशाहीचा विजय असो, म्हणत भोईर कुटुंबातील संजय भोईर, देवराम भोईर, उषा भोईर आणि सपना भोईर हे चौघेही एकाच प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. याच प्रभागात आमदार केळकर समर्थक भोईर कुटुंबियांच्या विरोधात उभे आहेत.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार संजय केळकर आणि शिवसेनेचे नेते संजय भोईर यांच्यात राजकीय मतभेद आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी संजय भोईर यांनी केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. अर्ज मागे घेतला असला तरी, प्रचारापासून दूर राहिले होते.

Shinde Sena leader Sanjay Bhoir with family meeting BJP MLA Sanjay Kelkar in Thane ahead of municipal elections, signaling possible political coordination despite earlier assembly-level rivalry.
Kalyan-Dombivli Election : मनसेची ऐनवेळी माघार, भाजपच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा; निवडणुकीच्याआधीच विजयाचा गुलाल उधाळला!

निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात केळकर यांनी भोईर यांची भेट घेतल्याने दोघांमध्ये तात्पुरते मनोमिलन झाल्याचे चित्र होते. युतीअंतर्गत चारही जागा भोईर कुटुंबियांच्या वाट्याला गेल्याने केळकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. काही समर्थक प्रचारापासून दूर राहिल्याचेही दिसून येत आहे. स्वपक्षातीलच काही नेते विरोधात उभे राहिल्याने भोईर कुटुंबियांची डोकेदुखी वाढली आहे. अशा परिस्थितीत भोईर कुटुंबियांनी आमदार केळकर यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चना उधान आले आहे.

ठाणे पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यामतून निवडणूक लढवीत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी कोपरी येथील आयुष्यमान आरोग्य केंद्र बंद असल्याच्या मुद्द्यावरून आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर टीका केली होती. या केंद्राचे उद्घाटन करणाऱ्या कोपरीतील माजी नगरसेविका मालती पाटील यांनी त्यास प्रत्युत्तर देत, केवळ आरोग्य केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी स्वत:च्या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमध्येही अशी केंद्रे उभारण्यासाठी निधी आणावा, असा टोला केळकर यांना लगावला होता.

Shinde Sena leader Sanjay Bhoir with family meeting BJP MLA Sanjay Kelkar in Thane ahead of municipal elections, signaling possible political coordination despite earlier assembly-level rivalry.
Thane Politics: चक्क अपक्ष उमेदवारासाठी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराची माघार! आता होणार तगडी फाईट

अशातच आता मालती पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. मात्र, केळकर समर्थकांनी मालती पाटील यांच्या विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत दगा फटका होवू नये, यासाठी कोपरी प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवार मालती पाटील यांनीही आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com