Pradeep Purnekar Murder Case: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येमागचं कारण समोर; एका आरोपीला अटक, पोलीस स्टेशनबाहेर कुटुंबीयांचा ठिय्या

Pradeep Purnekar murder News : ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी संपूर्ण मनोरमानगर आणि शिवसैनिक कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत.
pradip purnekar
pradip purnekar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या आरोपींनी पूर्णेकरांवर 5 राऊंड फायरिंग केली होती. या हत्या प्रकरणाचे खरे कारण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीनेच हत्येमागचे कारण पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आता त्याच्या इतर सहकाऱ्यांचा तपास सुरू केला आहे. लवकरच या आरोपींना अटक केली जाईल, असा दावा कापूरबावडी पोलिसांनी केला आहे. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनबाहेर कुटुंबियांने आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी संपूर्ण मनोरमानगर आणि शिवसैनिक कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. या रहिवाश्यांनी पोलिस (Police) ठाण्याला घेराव घातल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ठाण्याचे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली. या आरोपीनेच हत्येमागचे कारण पोलिसांना सांगितले आहे. त्या आरोपीने राजकीय आणि सामाजिक वादातून ही हत्या झाल्याची कबुली दिली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती सह पोलीस आयुक्त ज्ञानेश चव्हाण यांनी दिली.

pradip purnekar
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणी 5 हजार पानांच्या दोषारोपपत्रातून पोलिसांचे धक्कादायक खुलासे : फेक अकाऊंट, सिनेमा अन् सोनम प्रकरण...

अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार

पूर्णेकर कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी (Shivsena) सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असून, पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, मुख्य आरोपीला अटक झालीच पाहिजे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत पूर्णेकरांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही. त्यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

पूर्णेकर समर्थकांना आणि कुटुंबीयांना पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवरच अडवले आहे. जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतला आहे. थोड्याच वेळात पूर्णेकर यांचा मृतदेह जेजे रुग्णालयातून ठाण्यात आणण्यात येणार आहे. त्यातच पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर आणि शिवसैनिकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

pradip purnekar
Palghar Case : शिवसेना 'आमदार पुत्रा'ला पोलिसांची मदत? न्यायालयाने ओढले ताशेरे; 'कारवाई हास्यास्पद, घटनेतील सलाईन कुठे गेले?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com