Ketan Agarwal Case: 'माही' फेक अकाऊंट, सिनेमा अन् सोनम प्रकरण...; केतन अग्रवाल प्रकरणी 5 हजार 53 पानांच्या दोषारोपपत्रातून पोलिसांचे धक्कादायक खुलासे

Pune Police Chargesheet : केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्यही केली होती.आता याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालयात पोलिसांनी पाच हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे.
Lohagad Fort Ketan murder investigation details
Lohagad Fort Ketan murder investigation detailsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: लोणावळ्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल या तरुणाची त्याच्या होणार्‍या पत्नीनंच दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.याप्रकरणी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यासह त्यांचा वर्गमित्र रितेश हंगे या तीन जणांविरोधात वडगाव मावळ न्यायालयात तब्बल 5 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं आहे. यामुळे आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन कारवाईला गती मिळणार आहे.

पुणे पोलिसांनी केतन अग्रवाल खून प्रकरणात 5 हजार पानांचं दोषारोपपत्र वडगाव मावळ न्यायालयात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात पुणे पोलिसांनी लोहगड परिसरात केतन अग्रवालचा मृत्यू हा अपघाती नसून पूर्वनियोजित कट रचून हत्या असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

पुण्यातील ‘सक्सेस ग्रुप’ या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक असलेल्या 26 वर्षीय केतन अग्रवाल याचा 20 वर्षीय सिया गोयल हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये दोघांचा विवाह होणार होता. मात्र, 18 जून 2026 रोजी सियाने स्वतःचा वाढदिवस असल्याचे कारण देत केतनला ट्रेकिंगसाठी लोहगडावर नेले.

पोलिसांच्या तपासानुसार,लोहगडावर पोहोचल्यानंतर सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला दरीत ढकलले. सुरुवातीला केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना चेतन संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आला आणि पोलिसांचा संशय बळावला होता.

Lohagad Fort Ketan murder investigation details
Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच मोठा निर्णय होणार; रोहिणी खडसेंचं पद जाणार, नव्या महिला प्रदेशाध्यक्षा ठरल्या?

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्यही केली होती.आता याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालयात पोलिसांनी पाच हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे.

फेक ‘माही’ अकाउंटचा वापर

हत्येचा कट पुढे नेण्यासाठी तिघांनी मिळून ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या अकाउंटसाठी ओळखीच्या एका मुलीचा फोटो वापरण्यात आला. १८ जून रोजी या अकाउंटवरून सियाची मैत्रीण असल्याचे भासवून केतनशी संपर्क साधण्यात आला. सियाचा वाढदिवस लोहगडावर साजरा करून तिला सरप्राईज देण्याचे सांगून केतनला लोहगडावर आणण्याचे नियोजन करण्यात आले. हे संपूर्ण नियोजन रितेश हांगे करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Lohagad Fort Ketan murder investigation details
Marathwada Drought : कृषिमंत्री दत्ता भरणेंचा हिंगोली दुष्काळ पाहणी दौरा वादात; बार रेस्टॉरंट मालकाच्या शेतात केली पाहणी; प्रश्न विचारताच संतापले

पाठीमागून धक्का देत केतनला दरीत ढकलले ठरलेल्या नियोजनानुसार चेतन चौधरी हा गडावर जाणाऱ्या दुसऱ्या मार्गाने वर गेला आणि गडावरील मंदिरात जाऊन बसला. त्यानंतर सियाने त्याला खुणावून वर जाण्यास सांगितले. केतनचे लक्ष नसताना सियाने त्याच्या पाठीमागून खांद्याला धक्का दिला, तर चेतनने पायाला धक्का दिला. त्यानंतर चेतनने लाथ मारल्याने केतन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.या संपूर्ण हत्येचा कट रितेश हांगे याने रचल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. खून केल्यानंतर ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट डिलिट करण्यात आले.

याप्रकऱणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर त्यांचा वर्गमित्र रितेश हांगे यालाही बीडमधून अटक केली होती.या कारवाईमुळे प्रकरणात तिसरी अटक झाली असून,हत्येचा कट माहिती असतानाही तो पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा आरोप रितेशवर आहे.

सिया आणि चेतन यांनी केतनच्या हत्येचा कट रचला होता,याची माहिती रितेशला होती. 18 जून रोजी केतनला लोहगडावर नेण्याच्या कटात सहभागी होण्यासाठी त्यालाही सोबत येण्यास सांगण्यात आले होते. मात्र, रितेशने प्रत्यक्ष लोहगडावर जाणे टाळले.मात्र, गुन्हा घडल्यानंतरही रितेशचा चेतन आणि सियासोबत संपर्क कायम होता.

तपासाची दिशा पोलिसांकडे जाऊ नये,यासाठी त्याने चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲप संभाषण डिलीट केल्याचा आरोप आहे. मात्र,सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी हे डिलीट केलेले चॅट रिकव्हर केले. त्यातून रितेशचा आरोपींशी असलेला संपर्क आणि त्याला या कटाची माहिती असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार; 5053 पानी दोषारोपपत्र

या प्रकरणात पोलिसांनी पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच दोषारोपपत्रात कटाची आखणी, आरोपींच्या हालचाली, रेकी, बनावट सोशल मीडिया अकाउंट आणि हत्येपूर्वीचे नियोजन यासंदर्भातील माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोषारोपपत्र तब्बल 5 हजार 53 पानांचे आहे. या प्रकरणामुळे नियोजनपूर्वक हत्या करण्यासाठी सोशल मीडिया, चित्रपट आणि इंटरनेटवरील उपलब्ध माहितीचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला, याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी केतन अग्रवाल खून प्रकरणात 5 हजार पानांचे दोषारोपपत्र वडगाव मावळ न्यायालयात दाखल केले आहे.लोहगड परिसरात केतन अग्रवाल यांचा मृत्यू अपघाती नसून पूर्वनियोजित कट रचून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com