Eknath Shinde : ठाण्यात दोन मंत्र्यांतील संघर्ष शिगेला; एकनाथ शिंदेंनी खडसावले; म्हणाले, 'लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाहीत..'

Thane political clash News : भर बैठकीतच संतापलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन विभागाच्या कर्मचाऱ्याना खडसावले.
Eknath Shinde-Ganesh Naik
Eknath Shinde-Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Thane News : लोकसभा निवडणुकीपासून ठाण्यात भाजप-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संघर्ष तीव्र झाला आहे. नेहमीच या-ना त्या कारणाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे कार्यकर्ते यांच्यातील वाद सुरूच असतो. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष तीव्र झाला होता. त्यामुळे आता हा वाद मिटेल असे वाटत असतानाच आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने परत एकदा दोन्ही गटात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यातूनच भर बैठकीतच संतापलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन विभागाच्या कर्मचाऱ्याना खडसावले. यावेळी त्यांनी 'लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाहीत..' असे म्हणत संताप व्यक्त केला.

ठाण्याची ओळखही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा बालेकिल्ला अशीच आतापर्यंत राहिली आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात आक्रमक राजकारण सुरु केले आहे. ठाणे महापालिकेत गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. त्यामुळे ठाण्यावरील वर्चस्वावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे विरुद्ध नाईक यांच्यातील शीतयुद्धात प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अवस्था मात्र बिकट झाली आहे.

Eknath Shinde-Ganesh Naik
Shivsena UBT-BJP On Water Issue : कपडे फाडू, समोरासमोर या; आदित्य ठाकरेंच्या मोर्चाआधीच उद्धवसेना-भाजपमध्ये टेन्शन!

महायुती सरकारमध्ये भाजपचे (Bjp) गणेश नाईक हे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. ठाण्यात ते सातत्यानं जनता दरबार घेत असतात. ठाणे महापालिकेसाठी त्यांनी तयारी सूरी केली आहे. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातून आडवा विस्तवही जात नाही. या दोघांमध्ये संघर्ष आता त्यांच्या खात्यांपर्यंतही पोहोचला आहे. मान्सूनआधी प्रशासकीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी वनविभागाच्या कर्मऱ्यांना खडसावले आहे.

Eknath Shinde-Ganesh Naik
Maratha Reservation : पदभार हाती घेताच सरन्यायाधीश गवई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिले आदेश; नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय द्या

ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटातील रस्ता सातत्याने चर्चेत असतो. या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. बैठकीत या रस्त्याचा विषय निघाला. या रस्त्याची दुरुस्ती नुकतीच करण्यात आली. डांबरी रस्ता तयार करण्यात आला. त्यावरुन रस्ता सिमेंट काँक्रिटचा न करता डांबराचा का केला, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला परवानगी न दिल्यानं डांबराचा रस्ता करावा लागला, असे उत्तर शिंदेंकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यावरुन शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना परवानगीबद्दल विचारले. त्यावर वन क्षेत्रात सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधता येत नाही. त्यासाठी परवानगी देता येत नाही, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिंदेंना सांगितलं.

Eknath Shinde-Ganesh Naik
Maratha Reservation News : '...तर मुंबईत आंदोलन करणार', जरांगेंचा युती सरकारला इशारा

यावरुन शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. गायमुख भागात सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी ताबडतोड परवानगी द्या. अन्यथा गुन्हे दाखल करु, असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी शिंदे बरेच संतापलेले दिसले. 'लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब सांगा. घोडबंदर रोडवर सिमेंटचा रस्ता बांधण्यास परवानगी द्या. अन्यथा अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. तुमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही, या गैरसमजात राहू नका, अशा शब्दांत सुनावले.

Eknath Shinde-Ganesh Naik
Neelam Gorhe On Supriya Sule : नीलम गोऱ्हेंची 'NCP' एकत्र येण्यावर सुळेंना सूचक 'मेसेज'; 'स्थानिक'मध्ये महायुतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com