बारा आमदारांच्या निलंबनावरील सुनावणी पुढे ढकलली

१२ आमदारांच्या निलंबनाच्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालायात सुनावणी होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार (Ashish Shelar) दिल्लीमध्ये आले आहेत.
Vidhan Parishad
Vidhan ParishadSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आशिष शेलार (Ashish Shelar) दिल्लीला आले आहेत. १२ आमदारांच्या निलंबनाच्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालायात सुनावणी होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार (Ashish Shelar) दिल्लीमध्ये आले आहेत.

आता ही सुनावणी मंगळवारी होणार आहे. गेल्या अधिवेशानात विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल १२ सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. एक वर्षासाठी या सदस्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशी भाजपकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला होता. या निलंबनप्रकरणी भाजपचे नेते सर्वोच्च न्यायालय गेले आहेत.

संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी बागडिया आणि योगेश सागर या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका वर्षासाठी हे निलंबन करण्यात आले आहे.

Vidhan Parishad
सदाभाऊ खोतांचे आव्हाडांना प्रत्युत्तर ; 'जनतेनंही ठरवलयं २०२४ मध्ये बदल हवाच

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे निलंबन करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी केला होता.

पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. परंतु विरोधकांना बोलू दिलं जात नाही असं म्हणत भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेतला. सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत धक्काबुक्की केली असा आरोप सत्ताधारी आमदारांनी केला आहे.

Vidhan Parishad
बच्चू कडू मध्यरात्री वाबळेवाडी शाळेत ; म्हणाले, मी तुमच्यासोबत, लवकरच सुनावणी होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com