

Mumbai News : राज्यात आणखी 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना पूर्ण दिवस जात असल्यामुळे नवीन जिल्हा निर्मिती करावी आणि ती करण्यासाठी प्रस्तावना देण्यात आली आहे. अशास्वरुपाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून या निर्मितीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वांखाली महायुती सरकारकडून हिरवा कंदील मिळणार का ? याची जोरात चर्चा आहे.
महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला, महाराष्ट्र जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा अनेक जिल्हे लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने प्रशासकीय कामासाठी नागरिकांना जाण्या-येण्याचे अडचण होत होती पूर्ण दिवस दिवस तिथे जाण्यासाठी लागत होता.मोठ्या जिल्ह्यामधून नवीन जिल्हे निर्मिती करण्याची प्रक्रिया झाली त्यासाठी जवळपास २० वर्षाचा काळ लागला त्यानंतर आतापर्यंत राज्यामध्ये नवीन १० जिल्ह्याची भर पडून ३६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र झाला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होते.
ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) असे एकूण 26 जिल्हे मिळून महाराष्ट्र राज्य तयार झाले.
१९८१ पासून आत्तापर्यंत आणखी नवे दहा जिल्हे झालेत या जिल्ह्यामधून रत्नागिरीतून-सिंधुदुर्ग निर्माण झाला, छत्रपती संभाजीनगर मधून जालना, धाराशिव मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली, बृहन्मुंबई मधून मुंबई उपनगर, अकोला मधून वाशिम, धुळे मधून नंदुरबार, परभणी मधून हिंगोली, भंडारा मधून गोंदिया आणि ठाण्यामधून पालघर असे दहा जिल्हे निर्माण झाले.
नाशिक - मालेगाव, कळवण.
पालघर - जव्हार.
ठाणे - मीरा-भाईंदर आणि कल्याण
अहमदनगर - शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर.
पुणे - शिवनेरी
रायगड - महाड
रत्नागिरी - मानगड
सातारा - मानदेश
गडचिरोली - अहेरी
बीड - अंबाजोगाई
लातूर - उदगीर
नांदेड - किनवट
जळगाव- भुसावळ
बुलढाणा - खामगाव,अचलपूर
यवतमाळ - पुसद
भंडारा - साकोली
चंद्रपूर - चिमूर