काय हवे ते जनतेने ठरवावे;शंभर कोटींचे वसुली सरकार की शंभर कोटी लस देणारे सरकार

देशात शंभर कोटी नागरिकांना लस दिल्याचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने मुंबईत भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांचे सत्कार करण्यात आला.
मुंबई भाजपा
मुंबई भाजपासरकारनामा

मुंबई : दरमहा शंभर कोटींचे हफ्ते वसुल करणारे सरकार की शंभर कोटी कोरोना लसी देणारे सरकार यातून जनतेने निवड करावी, असे आवाहन मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे आज करण्यात आले. देशात शंभर कोटी नागरिकांना लस दिल्याचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने मुंबईत भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांचे सत्कार करण्यात आला.

सकाळी कांदिवलीच्या कामगार राज्य विमा योजना रुग्णालयात आमदार अतुल भातखळकर यांच्यातर्फे तेथील नर्स, डॉक्टर तसेच कोरोनाकाळातही वार्तांकन करणारे पत्रकार आदी 103 जणांचा सत्कार करण्यात आला. तर वांद्रे पश्चिम येथे आमदार आशीष शेलार यांनी दहा लसीकरण केंद्रे आणि कोविड वॉररूम अशा अकरा केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. दादरच्या मुंबई भाजपा कार्यालयातही अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत संध्याकाळी यानिमित्ताने विशेष कार्यक्रम झाला.

मुंबई भाजपा
आंदोलनांपेक्षा प्रत्यक्ष काम किती कठीण; आता चाकणकरांना कळेल

भारताने शंभर कोटी लसी देऊन मोठा टप्पा पार केला आहे. कोविडच्या फैलावात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील परिस्थिती कौशल्याने हाताळण्यात आली. लॉकडाऊन लावून रोगाचा फैलाव रोखणे, गरीबांना विविध योजनांद्वारे मदत करणे, उद्योगांसाठी विविध पॅकेज-अर्थसाह्य जाहीर करणे, वैद्यकीय सुविधा उभारणे अशी कामे करण्यात आली. आता डिसेंबर महिन्यात भारत 200 कोटी लशींचा टप्पा गाठेल, असा विश्वासही भातखळकर यांनी व्यक्त केला. दरमहा शंभर कोटींचे हफ्ते वसुल करणारे सरकार की शंभर कोटी कोरोना लस देणारे सरकार यातून जनतेने निवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबई भाजपा
राम कदमांनी प्रार्थना देवाकडे नव्हे; मोदींकडे करावी

संध्याकाळी दादरच्या मुंबई भाजपा कार्यालयातही अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम झाला. कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली, असे लोढा यांनी सांगितले. या मोहिमेत मोलाचा वाटा उचलणारे आरोग्यसेवक, कोरोनायोद्धे या सर्वांचेही यानिमित्ताने आभार मानण्यात आले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com