Maharashtra Monsoon Session 2023 : मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची टास्क फोर्स स्थापन करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Maratha Reservation : विधान परिषद कामकाजावेळी तारांकित प्रश्नोत्तर यादीत यासंदर्भात माहिती दिली आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Monsoon Session 2023 : मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची टास्क फोर्स स्थापन केली जाईल, अशी माहिती विधान परिषद कामकाजातील तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीत यासंदर्भात माहिती दिली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचंही यादीत नमुद करण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुर्नविचार याचिका फेटाळली असली तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. क्युरेटिव्ह' याचिका फेटाळल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी एक समर्पित मागासवर्ग आयोग नेमले जाईल, असंही या यादीत म्हटलं आहे.

Maratha Reservation
Monsoon Session-Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी ठाण मांडलेल्या दत्ता पाटलांचे आंदोलन सभागृहात गाजले

 मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मंगळवारी (१७ जुलै) माजी मंत्री अशोक चव्हाण यांनीनांदेडमध्ये उपोषणाला बसलेल्या दत्ता पाटील या तरुणाच्या मुद्द्यांकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात सरकारचे लक्ष वेधले. तसेच, त्याची समजूत काढून त्याला उपोषण सोडण्यास मदत करावी, असा आग्रहही चव्हाणांनी धरला.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत संबंधित तरुणाला आश्वासित करणार असल्याचं त्यांनी "या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली जाईल. या संदर्भातील भूमिकाही स्वतंत्रपणे सभागृहात मांडू. पण सध्या त्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. शासनाकडून त्याला विनंती केली जाईल आणि त्याचं उपोषण सुटेल,याचीही काळजी घेतली जाईल, असं आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं.

Maratha Reservation
Monsoon Session-Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी ठाण मांडलेल्या दत्ता पाटलांचे आंदोलन सभागृहात गाजले

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडून ११ एप्रिल २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्य सरकारने आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका मांडावी, असे आवाहन याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले होते. महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण लागू केले होते. या आरक्षणाविरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाविरोधातही अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मराठा आरक्षण याचिकेचे समन्वयक विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. शिवाय, राज्य सरकारनेकडून ही अशाच प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आज निकाल दिला आहे. मराठा आरक्षण याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.