Thackeray group Morcha: ठाकरेंच्या मोर्चाला अखेर परवानगी मिळाली; पण मार्ग बदलल्यावर...

Shivsena : ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
Thackeray group Morcha
Thackeray group MorchaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेवर येत्या 1 जुलैला शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण अखेर मोर्चा काढण्याच्या मार्गात बदल करण्यात आल्यानंतर मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

महानगरपालिकेवर प्रशासक राज आल्यापासून रस्त्याच्या कामात आणि खडीच्या कामात मोठे घोटाळे झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर या विरोधात ठाकरे गटाने मोर्चाची हाक दिली. या मोर्चाचा ठाकरे गटाने एक टीझरही शेअर केला. पण त्यानंतर प्रशासनाने कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारली होती.

Thackeray group Morcha
Pimpri-Chinchwad: सव्वादोन लाख कुटुंबापर्यंत पोहचून पिंपरी महापालिकेची सत्ता मिळविण्याचा भाजपचा संकल्प !

त्यामुळे ठाकरे गट काय भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण अखेर ठाकरे गटाच्या या भव्य मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, मोर्चाच्या मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला.

Thackeray group Morcha
Uddhav Thackeray on BMC: मुंबई महापालिकेवर एक जुलैला भव्य मोर्चा काढणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

दरम्यान, आता ठाकरे गटाचा मोर्चा महापालिकेच्या समोरून जाणार आहे. तसेच मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com