Devendra Fadnavis : फडणवीसांचे कार्यालय फोडणाऱ्या महिलेची ओळख पटली, धक्कादायक माहिती समोर

Woman vandalized Devendra Fadnavis office : महिलेने ती राहत असलेल्या सोसाटीमध्ये देखील तोडफोड केली असल्याची माहिती समोर आली आहे.
 woman vandalized Devendra Fadnavis offic
woman vandalized Devendra Fadnavis officsarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : मंत्रालयामध्ये घुसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर तोडफोड करणारी महिलेची ओळख पटली आहे.धनश्री सहस्त्रबुद्धे असे या महिलेचे नाव असून ती मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. महिलेने ती राहत असलेल्या सोसाटीमध्ये देखील तोडफोड केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वात सुरक्षित ठिकाण मंत्रालय समजले जाते. मात्र, मंत्रालयात विना पास घूसून महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर तोडफोड केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

 woman vandalized Devendra Fadnavis offic
Sharad Pawar : शरद पवारांची साथ सोडलेल्या 'या' दिग्गजांची उडाली झोप!

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहि‍णींसाठी योजना काढत आहेत पण बहिणी तुमच्यावर नाराज आहेत हेच या तोडफोडीतून सिद्ध होते असे म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी कोणती बहीण नाराज असेल तर तिची नाराजी दूर करू असे सांगितले होते.

सोसायटीमध्येही तोडफोड

महिलेची ओळख पटल्यानंतर धनश्री सहस्त्रबुद्धे हिचा शोध घेण्यासाठी पोलिस तिच्या सोसायटीमध्ये पोहोचले. त्यावेळी तेथील रहिवाशांनी धनश्री सहस्त्रबुद्धे ही मानसिक रुग्ण असून ती सोसायटीमध्ये देखील तोडफोड करत असे सांगितले. तसेच तीला सलमान खानसोबत लग्न करयाचे असल्याचे देखील सांगत असते असे सोसायटीमधील नागरिकांनी सांगितले.

 woman vandalized Devendra Fadnavis offic
Dharmaveer 2 : "भाजपच्या मदतीने आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा..." राऊतांचा CM शिंदेंवर गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com