
Mumbai, 11 July : विधानसभेत आज (ता. 11 जुलै) आवाजाच्या पातळीबाबत (डेसिबल) चर्चा झाली. त्या चर्चेत विरोधी पक्षासोबत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली. ती देत असताना आवाजाच्या पातळीबाबत कायदा केला तर पाहिली कारवाई सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावरच होईल, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात डेसिबलवर (आवाजाची मर्यादा किंवा पातळी) चर्चा झाली. त्यात विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विविध उदाहरणे प्रश्न मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक (Sana Malik) यांनी आवाजाच्या पातळीबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे उदाहरण दिले. आपल्या सभागृहाचे डेसिबलही 60 च्या वर आहे, असे त्यांनी नमूद केले. त्याचवेळी हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असला तरी राज्य सरकारने डेसिबलबाबत सर्वेक्षण करून केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी केली.
सना मलिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आपण डेसिबल लेव्हलचा आपण विचार केला तर ॲबिएंट नाईज लेव्हल आहे, तीच आपल्याकडे जास्त आहे. ॲबिएट व्हाईस लेव्हल आहे, ती आपल्या डेसिबल लेव्हलच्या वर जाते, त्यामुळे त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.
मुख्यमंत्री डेसिबलवर बोलत असतानाच विरोधी बाकावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी ‘तुम्ही बोललात शंभरच्या वर जाते,’ अशी कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्याला फडणवीसांनीही जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, भास्करराव, तुमचीही दीडशेच्यावर (150 डेसिबल) जाते. त्याचवेळी विरोधी बाकावरून काही सदस्य बोलत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याबाबत विधान केले.
आवाजाच्या संदर्भात एखादा कायदा केला, तर पहिली कारवाई सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर होईल. कुठल्याही भोंग्यापेक्षा सुधीरभाऊंचा आवाज मोठा आहे, त्यांना कोणत्याही माईकची गरज लागत नाही. तेवढ्यात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी ‘दहा वाजताच्या भोंग्यापेक्षा का?,’ असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला.
नाना पटोले यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ‘विचारांचे प्रदूषण ते करत नाहीत. सुधीरभाऊ कधीही विचाराचे प्रदूषण करत नाहीत, ते विचार मांडतात, असे सांगून अप्रत्यक्षपणे माजी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.