मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरच हल्ला करण्याचा होता कट..! शिवतारेंचा गौप्यस्फोट

Shivsena Politics| शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यापासून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे
vijay Shivtare| CM Sknath Shinde|
vijay Shivtare| CM Sknath Shinde|
Published on
Updated on

पुणे : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यापासून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या हल्ल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह ५ जणांना आणि शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशात या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विजय शिवतारे यांनी हा गौप्सस्फोट केला आहे. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्ला करण्याच डाव होता, असा खळबळजनक दावा शिवतारे यांनी केला आहे. हा हल्ला झाल्यानंतर ज्या चर्चा आमच्यापर्यंत आल्यात त्यात मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सोडणार नाही, अशा वल्गना काही लोकांकडून केल्या जात होत्या. मुख्यमंत्र्यांचा जो नियोजित मार्ग होत्या त्या मार्गावरच अशी कुजबूज होती की गाडीवरच हल्ला करायचा, दगड मारायचे, हल्ला करायचा, जेणेकरुन एक वेगळा संदेश महाराष्ट्रात पोहचेल. पण महाराष्ट्रात असं काही होत असेल तर ते चुकीच आहे.

vijay Shivtare| CM Sknath Shinde|
Eknath Shinde गटाचे काय होणार? : हरिश साळवे यांच्यावर आता अखेरची भिस्त!

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शांत राहायला सांगितलं आहे. पण आम्ही कोणालाही घाबरत नाही, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं आहे की, आपण शक्य तितकं संवैधानिक, लोकशाही पद्धतीने वागण गरजेच आहे आणि महाराष्ट्राचीही आपल्याकडून तिच अपेक्षा आहे. पोलीस असतानाही त्यांच्यावर हल्ला कऱण्यासाठी काही लोक पुढे आले होते त्यावेळी पोलीसांना ते लोक धक्काबुक्की केल्याचं शिवतारे यांनी सांगितलं.

उदय सामंत यांनी हल्ल्यानंतर आठ दिवसात जशात तसं उत्तर देण्याचा इशारा दिला असे विचारले असता शिवतारे म्हणाले की, भावनेच्या भरात ते काही बोलले असावेत. पण गेल्यावेळी त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला तेव्हाच पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर आजचा दिवस आला नसता. असे सांगत त्यांची पाठराखण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com