Vaibhav Patil Offer to Shivsena : वैभवदादा, आमदार व्हायचंय तर शिवसेनेत या; ठाकरे गटाची राष्ट्रवादीच्या नेत्याला खुली ऑफर!

Khanapur-Atpadi Assembly : विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी ज्या प्रमाणे सांगली लोकसभेत सहानुभूती निर्माण केली, त्याच पद्धतीने सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न वैभव पाटील यांचा असू शकतो. पण, तसं काही होणार नाही.
Sanjay Vibhute-Vaibhav Patil
Sanjay Vibhute-Vaibhav PatilSarkarnama

Sangli, 18 June : वैभवदादा, तुम्हाला खानापूर-आटपाडीचे आमदार व्हायचं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करा आणि आमच्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवा, अशी खुली ऑफर शिवसेनेचे ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांना दिली.

महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील (Vaibhav Patil) यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विधानसभा लढविणार असल्याचे म्हटले आहे. मात्र या मतदारसंघाचे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे होते, त्यामुळे शिंदे गटाचा या मतदारसंघावर दावा असणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते (Sanjay Vibhute) यांनी राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांना शिवसेना प्रवेशाचे आवताण दिले आहे.

जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मला त्यांना एक सल्ला द्यायचा आहे की महायुती किंवा महाआघाडी होत असताना त्यावेळी तेथील विद्यमान आमदाराला ती जागा सुटते, हा सर्वमान्य नियम आहे. त्यानुसार महायुतीमध्ये खानापूर-आटपाडी मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार, हे कोण्या ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.

आज गोपीचंद पडळकर, वैभव पाटील हे मोठंमोठे मेळावे आणि घोषणा करीत आहेत. त्यांना माझं सांगणं आहे की, महायुतीमध्ये खानापूर-आटपाडी हा मतदारसंघातून शिंदे गटच विधानसभेची निवडणूक लढवेल, यात कोणतीही शंका नाही. तुम्हाला जर खानापूर आटपाडीमधून विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर पडळकर आणि वैभव पाटील यांना खुली ऑफर देतो की, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या आणि आमच्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवा, असे आवाहन विभूते यांनी केले.

Sanjay Vibhute-Vaibhav Patil
Khanapur-Atpadi Assembly : पडळकरांनंतर राष्ट्रवादीच्या वैभव पाटलांचा खानापूरमध्ये शड्डू; शिंदे गटाचे काय होणार?

विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी ज्या प्रमाणे सांगली लोकसभेत सहानुभूती निर्माण केली, त्याच पद्धतीने सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न वैभव पाटील यांचा असू शकतो. पण, तसं काही होणार नाही. हा मतदारसंघ कोणाला सुटणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही सहानुभूतीच्या पाठीमागे न लागता शिवसेना ठाकरे गटात येऊन विधानसभेची निवडणूक लढवा, असा सल्लाही संजय विभूते यांनी वैभव पाटील यांना दिला.

Sanjay Vibhute-Vaibhav Patil
Mahayuti Dispute : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार महायुतीतून बाहेर पडणार; नागपूरच्या बड्या नेत्याचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com