

Mumbai News : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफसह दोघेजण जखमी झाले आहेत. या मध्ये टायगर श्रॉफच्या गाडीचा चालक व अन्य एकजण जखमी झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे समजते. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास या अचानक झालेल्या हल्ल्यात अभिनेता टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफवर गोळीबार केला.
जुहू परिसरातील पुष्पा पार्क मैदानावर टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी गेला असताना गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. टायगर श्रॉफ सुरक्षित असून, त्याला गोळी लागल्याने कोणतीही दुखापत झालेली नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जुहू परिसरात तीन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले होते. या तिघांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला. टायगर श्रॉफसोबत आणखी दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहेत. ते तिघे जण नेमके कोण आहेत? याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी आली होती. त्या धमकी प्रकरणात पंजाबमध्ये एकाला अटक करण्यात आली होती. खार पोलिसांच्या पथकाने याप्रकरणात आरोपीला पंजाबमधून ताब्यात घेतले होते. आरोपी सुरक्षा रक्षक होता, कामावर गैरहजर असल्यामुळे त्याचा पगार कापण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.