उद्धव ठाकरेंची 'ती' टीका मुख्यमंत्री शिंदेंच्या जिव्हारी; भाषण करताना पाराच चढला...

Eknath Shinde : तुम्हाला राणेंना बाजूला करून मुख्यमंत्री व्हायचं होतं...
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे काल (ता.५ऑक्टोबर) दोन मेळावे (Dasara Melava) झाले. बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) तर शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला. दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांवर सडकून टीका केली.

दरम्यान, 'शिवतीर्था'वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात शिंदे गटावर जोरदार टीका केला. त्याचबरोबर आपण महाविकास आघाडी का स्थापन केली. याबाबत ठाकरे यांनी आपल्या आई-वडिलांची शपथ घेऊन मुख्यमंत्री पदाच्या वाचाघाटीत केंद्रीय गृहमंत्री शहांसोबत काय ठरले होते. हे पुन्हा एकदा सांगितले. याबरोबरच शिंदेंनीही त्यावेळी आपल्या सोबत शपथ घेतली होती. तेव्हा का नाही विचार केला,असा सवाल करत शिंदेवर जोरदार टीका करत त्यांच्या मुलाच्या खासदारकीवरूनही त्यांना टोला लगावला. (Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News)

Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कुणाला ? उद्याचा दिवस महत्वाचा..

उद्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाचा गद्दार असाच उल्लेख करणार, असे म्हणतं त्यांना डिवचले. तसेच हे भाजपची गुलामगिरी करत असल्याचे म्हणतं. आमच हिंदूत्व हे शेंडी जाणव्याचं नसल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर ज्यांना मंत्री, आमदार, खासदार केले ते गद्दार झाले. मात्र ज्यांना काही दिले नाही ते माझ्या सोबत आहेत.

तसेच शिंदेंवर टीका करतांना म्हणाले की, बाप मंत्री, कार्ट खासदार आणि आता नातवालाही नगसेवक करा..पण त्यांला आधी शाळेत तरी जाऊ द्या, अशी टीका ठाकरे यांनी शिंदेंवर केली. दुसरीकडे बीकेसी मैदानावर भाषण करत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जेव्हा भाषण करतांना ठाकरेंच्या टीकेची चिठ्ठी देण्यात आली त्यावर त्यांनी उत्तर द्यायला सुरूवात केली. मात्र, जेव्हा नातवावरच्या टीका वाचली तेव्हा शिंदेंचा पारा कमालीचा चढला आणि त्यांचा त्यांचा संयम सुटू लागलेला दिसला. तेव्हा त्यांनी आपण माझ्या दिड वर्षाच्या नातवावर टीका करत आहेत. आपण कोणत्या पातळीवर जाऊ शकता हे दिसत आहे. आता आपल्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. माझ्या नातवाचा जन्म झाला आणि तुमच्या पतणाला सुरूवात झाली, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले.

याबरोबरच आपणचं आपल्या वडिलांचे विचार विकले आपल्याला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दाच त्यांनी ठाकरेंना सवाल केला. त्यावेळी शिंदे हे चिडल्याचे स्पष्ट दिसत होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
Rohit Pawar : "जनता सोबत असली की किल्ला अभेद्य राहतो, निष्ठा जिंकली!"

दरम्यान, आम्ही समाजहिताच्या कामासाठी आणि शिवसेना वाढवण्यासाठी शेकडो केसं आमच्या अंगावर घेतल्या तुम्ही साधी चापट तरी मारली का कुणाला, अशी भाजप नेते नारायण राणेंचीच भाषाही त्यांनी बोलून दाखवली. तुम्हाला राणेंना बाजूला करून मुख्यमंत्री व्हायचं होत,असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यावर आता सविस्तर राणे बोलतील,असेही शिंदेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com