Maharashtra Political Crisis: ठाकरे गटाच्या पदरी प्रतीक्षाच; महत्त्वाच्या दोन्ही सुनावण्या लांबणीवर..

Thackeray Group SC Hearings Postponed: सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात यावर विधानसभा अध्यक्षांना दिले होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या (Maharashtra Politics) दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दोन याचिकांच्या सुनावण्या प्रलंबित आहेत. या दोन्ही याचिकांवर सुनावण्या आता लांबणीवर पडल्या. यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकांच्या सुनावण्यांसाठी आता प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Maval NCP : पोलिसांनी ‘टायपिंग मिस्टेक’ केली अन्‌ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आरोपी बनले...

शिवसेना ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षांसदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर उद्याही सुनावणी होणार नसल्याचे समजते आहे. यासोबतच ठाकरे गटाच्या वतीने दाखल शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रताबाबतचा प्रकरणाची सुनावणीही लांबणीवर पडली आहे.

याबाबत ३१ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र ताज्या माहितीनुसार हे प्रकरण न्यायालयाच्या यादीत आलेले नाही. यामुळे दोन्ही याचिकांवरच्या सुनावण्या लांबणीवर पडल्या आहेत.

Uddhav Thackeray
Chitra Wagh On Thackeray: 'राष्ट्रपतिपदी आदिवासी महिला आहेत हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही'; चित्रा वाघांचा ठाकरेंना टोला

सुनील प्रभूंची याचिका :

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या 16 आमदार अपात्रता प्रकरणावरची सुनावणी लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात यावर विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यावर उद्या सुनावणी होणार होती. याबाबत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com