आमच्याकडे ही खोके येत आहेत; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना डिवचले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सांगलीतील शिवसैनिकांनी भेट घेतली
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on: 
Updated on: 

Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीमुळे 'खोके' हा शब्द राज्यात चांगलाच गाजत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील पाच खोके नॉट ओके म्हणत बंडखोरांना डिवचले आहे. 'मातोश्री'वर आज सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसैनिकांनी पाच बॉक्स भरून सभासद नोंदणी आणि प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे उद्धव ठाकरे यांना दिले.

यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या खोक्यांची चर्चा सुरू आहे. तुम्हीदेखील पाच खोके आणले आहे. मात्र, पाच खोके नॉट ओके. त्यांचे खोके वेगळे आहेत आणि आपल्या खोक्यात निष्ठा असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
Pune Politics: फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळणार? गिरीश बापट म्हणतात...

बंडखोरांचा उल्लेख टाळत ते म्हणाले, त्यांच्याकडे सगळे पैशांनी काम होत आहेत. सगळ्याच गोष्टींसाठी पैशांचा वापर होत आहे. मात्र, आपल्याकडे निष्ठा आहे, प्रामाणिक लोक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज आलेले सदस्यनोंदणीचे गठ्ठे हा पहिला टप्पा असल्याचे समजतो. यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर हे निष्ठेचे खोके यायला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात हिंमत नसल्याचेही ठाकरे यांवेळी म्हणाले. राज्यातील जनता निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी वाट पाहत आहे. मात्र, निवडणुका येईपर्यंत लोकांपर्यंत आपण जायला हवे, असेही ते म्हणाले. अधिकाधिक लोकांना आपण शिवसेनेसोबत जोडायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

Uddhav Thackeray
नितीन गडकरींना मिळणार मोठी जबाबदारी? भाजप नेत्याने स्पष्टचं सांगितलं...

दरम्यान, राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून बंडखोर आमदारांवर टीका केली जात आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून '50 खोके, एकदम ओके' अशा घोषणा दिल्या जात आहेत. या घोषणाबाजीने बंडखोर आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे असल्याचे म्हटले जात आहे. विधीमंडळातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार बाहेर पडत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी '50 खोके, एकदम ओके' अशी घोषणा दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com