Pune Politics: फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळणार? गिरीश बापट म्हणतात...

Devendra Fadanvis| Girish Bapat| देवेंद्र फडणवीस आता आगामी निवडणूक पुणे लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Devendra Fadanvis| Girish Bapat|
Devendra Fadanvis| Girish Bapat|
Published on
Updated on

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पुणे लोकसभा मतदारसंघातून लढले तर मला आनंदच होईल, त्यांना पुण्यातून उमेदवारी दिल्यास मला कोणताही आक्षेप नाही, अशी भूमिका खासदार गिरीश बापट यांनी आज (21 ऑगस्ट) स्पष्ट केली. त्यामुळे गिरीश बापट यांनी एकप्रकारे फडणवीसांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. (Pune Political news)

दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णीही लागली. राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेले देवेंद्र फडणवीस आता आगामी निवडणूक पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. त्यातच आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे.

Devendra Fadanvis| Girish Bapat|
Nanded : सत्तारांनी घेतली चव्हाणांची भेट ; म्हणाले सगळं काही ओक्के..

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहीत, देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. आता ही मागणी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संघटनांनी योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यायचा असतो. पक्षाची उमदेवारी कोणाला द्यायची याबाबत निर्णय पक्षातील प्रमुख नेते घेतात. त्यासाठी त्यांची एक यंत्रणा असते. अध्यक्ष असतात, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवाय़ला लागल्य़ा तर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे अशा संघटनांनी योग्य आणि अयोग्य याचा विचार करुनच त्यांनी कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यायचा असतो. पण, देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला कोणतीही अडचण नाही. उलट फडणवीस पुण्यातून उभे राहिल्यास मला आनंदच आहे. असेही गिरीष बापट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com