Uddhav Thackeray Thane Visit : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे भावूक; ठाण्यात जाऊन कुटुंबीयांची घेतली भेट

Uddhav Thackeray action mode News : या हत्येच्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पावले उचलली. बुधवारी दुपारी मातोश्रीवर सर्व विभागप्रमुखाची बैठक बोलावली होती.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी 5 राऊंड फायरिंग करण्यात आल्याचे समजते. ठाण्यातील विभागप्रमुखाची निर्घृणरित्या हत्या करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्येच्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पावले उचलली. बुधवारी दुपारी मातोश्रीवर सर्व विभागप्रमुखाची बैठक बोलावली होती. तर बैठकीनंतर बुधवारी सायंकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत ठाण्याला गेले होते. या दोघांनीही पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यासोबतच पोलीस ठाण्यातही बसले होते. त्यानंतर पोलिसांनी पुरवणी जबाबात आणखी काही आरोपींची नावे समाविष्ट केली. त्यानंतर गुरुवारी दुपारनंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्याला जाऊन पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

पूर्णेकर यांंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्याशिवाय तातडीने माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे दोघेजण ठाण्याला गेले होते. या दोघांनीही पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याशिवाय पोलीस ठाण्यात जाऊन काही वेळ ठिय्या मांडला होता. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा करून वगळण्यात आलेल्या काही राजकीय नेत्याची नावे पुरवणी जबाबात समाविष्ट करण्यास सांगितले. त्यामुळे येत्या याकाळात हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ठाण्यात गेल्यानंतर राम पूर्णेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील पोलीस आयुक्तांशी दोघांनी सविस्तर चर्चा केली. या प्रकरणात पोलीस यंत्रणेकडून सुरु असलेल्या तपासाबाबत माहिती घेतली.

Uddhav Thackeray
Pradip Purnekar News: प्रदीप पूर्णेकरांची हत्या, हादरवणाऱ्या CCTV फुटेजनंतर आता 'सीटी स्कॅन' रिपोर्ट समोर; एक गोळी मानेतून आरपार तर एक...

गुरुवारी दुपारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपीना फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. त्याशिवाय या हत्याप्रकरणात सुरु असलेल्या पोलीस तपासाबाबत उद्धव ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली. यावेळी ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Pradeep Purnekar Murder: प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणात ठाकरे अन् राऊतांचे गंभीर आरोप; मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com