Mumbai News : कोल्हापूरला महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर महाविकास आघाडीनेही बुधवारी मुंबईतील बीकेसीत महाराष्ट्र स्वाभिमान सभेद्वारे प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.
या सभेत तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील महायुतीवरही तुफान हल्ला चढवला. तसेच महाविकास आघाडीची पंचसूत्रीही मांडली. पण या सभेआधीच उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पारा चढलेला पाहायला मिळाला.
मुंबईतील बीकेसीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) संयुक्त'महाराष्ट्र स्वाभिमान सभेसाठी राहुल गांधी, शरद पवार ही नेतेमंडळी अगोदर पोहोचली होती. तर उद्धव ठाकरेंना सभास्थळी यायला काहीसा उशीर झाला. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. पण सभास्थळी पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवलं आणि उद्धव ठाकरे चांगलेच संतापले.
उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणातून आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीकेचे आसूड ओढताना दिसून येतात. पण इतरवेळी मात्र ते प्रचंड संयमी भूमिका घेत असतात. आज त्यांच्या सुरक्षारक्षकांना बीकेसीतील सभास्थळी अडवल्यानंतर ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. त्यांना भडकल्याचं पाहून तेथील वातावरणात काळीवेळ गोंधळ उडाला होता.
उद्धव ठाकरे उपस्थित मुंबई पोलिसांना म्हणाले, कोण आहे तो?,आत घ्या, सगळ्यांना पहिलं. कोण आहे तो त्याचं नाव घ्या त्याचं नाव घेऊन ठेवा. उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यानेही यावेळी नाराजी व्यक्त केली. 'गवळी, तुम्ही सगळ्यांना त्रास देताय', असं त्या कार्यकर्त्याने पोलिसांना उद्देशून वक्तव्य केलं.
महाविकास आघाडीने बीकेसीमधील महाराष्ट्र स्वाभिमानी सभेत पंचसुत्री मांडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी बेरोजगार युवकांना दरमहा चार हजार रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच मुंब्रा येथे शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चॅलेंजला सडेतोड उत्तर दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, देवाभाऊ जाऊ तिथे खाऊ. मला कसलं चॅलेंज देताय. मुंब्रामध्ये जाऊन बघा. तेथे प्रवेशद्वारावरच्या कमानीवर शिवाजी महाराजांचे शिल्प आहे. त्या शिल्पात जिजाऊमाता आहेत. सावित्रीबाई फुले देखील आहेत. 'तुम्ही ज्या विषयी बोलताय तो भाग ठाण्यात येतोय. मग तुम्ही त्या गद्दाराला डोक्यावर घेतलाय कशाला. वेडीवाकडी आव्हान आम्हाला देऊ नका.ठाण्याचे बकालीकरण चालले आहे. त्यांच्या विरोधात आम्ही चांगला जाहीरनामा देऊ.' असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.