Loksabha Election 2024 : अबब! 500 पासून ते लाखांपर्यंतच्या पैजा; निकालानंतर कुणाचा खिसा गरम होणार तर कुणाचा खाली...

Kolhapur Political News : दोन्हीही मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असताना प्रत्यक्षात मतदानात मात्र कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तितकीच इर्षा आणि उमेदवारा प्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे.
Kolhapur LokSabha Election 2024:
Kolhapur LokSabha Election 2024:Sarkarnama

Kolhapur News : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची आणि चर्चेची बनली आहे. राज्यातील राजकारणात झालेली उलथा-पालथ, महायुतीच्या उमेदवारांबाबत असलेली नाराजी, आणि महाविकास आघाडीतून समोर आलेले तुल्यबळ उमेदवार यामुळे यंदाची निवडणूक तितकीच महत्वपूर्ण बनली आहे. (Mahavikas Aaghadi Vs Mahayuti)

दोन्हीही मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असताना प्रत्यक्षात मतदानात मात्र कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तितकीच इर्षा आणि उमेदवारा प्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे. गावागावातील गल्ली, चौक, पार आणि चावडीवर कोणता उमेदवार निवडून येणार याचीच चर्चा रंगली आहे. केवळ चर्चा रंगली नाही तर पाचशे रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत पैजा एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी लावल्या आहेत. पण प्रत्यक्षात 4 जूनलाच या कार्यकर्त्यांचे पितळ उघड पडणार आहे हे नक्की.

Kolhapur LokSabha Election 2024:
Sharad Pawar News : तपास यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर; शरद पवारांचा घणाघात

जिल्ह्यातील कोल्हापूर (Kolhapur) व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी काल चुरशीने मतदान पार पडले. कोल्हापुरात 71.50 तर हातकणंगलेत 71.01 टक्के मतदान झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का वाढ इतकी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्क्याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे शिवाय आपल्या विजयाची खात्री देखील छातीठोकपणे करत असल्याचे समोर येत आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे सर्वच पक्षातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे शिवाय कार्यकर्तेही अजूनही संभ्रमात आहेत.

अशातच काही हौशी कार्यकर्त्यांनी आपलाच नेता निवडून येणार असा छातीठोकपणे दावा 500 पासून ते लाखांपर्यंत पैजा लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर महाविकास आणि महायुती सोबत कोण कोणते नेते आहेत त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मताधिक्य मिळेल याचेही अंदाज बांधले जात आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे, तर उर्वरित तीन मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख नेते कोणासोबत होते, त्यांनी प्रत्यक्ष काम केले का नाही? जे सुरुवातीला एका बाजूने होते, त्यांनी अंतिम टप्प्यात कुणाचे काम केले ? यासारखी माहिती एकत्रित करून विजयाचे गणित मांडले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हातकणंगले मतदारसंघातही महाविकास आघाडीचे तीन, तर महायुतीचे तीन आमदार आहेत. समसमान ताकद असली तरी उमेदवारांविषयीची नाराजी, संपर्काचा अभाव, विकास कामांबाबतचा आरोप हे मुद्दे चर्चेत राहिले. शिवाय महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajit Patil) यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ही त्यांना मिळालेली महाविकास आघाडीची रसद महत्त्वाची आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील यांची निर्णायक भूमिका यामध्ये महत्त्वाचे आहे. तर या मतदारसंघात भाजपने अपक्ष आमदारांना सोबत घेऊन वाढवलेली ताकद ही महायुतीसाठी ही महत्त्वाची आहे. मात्र, अंतिम टप्प्यात कोणाचे ‘काम’ केले आणि ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला यावर सर्व गणित अवलंबून आहे. त्यामुळे याचा फैसला चार जून रोजी होईल. निकालानंतर मात्र सगळेच उघडे पडण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Kolhapur LokSabha Election 2024:
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसाठी आडसकरांवर दुहेरी जबाबदारी; माजलगाव, केजमध्ये घातले लक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com