Uddhav Thackeray: पहिल्याच पावसानं मुंबईची दाणादाण; उद्धव ठाकरेंनी भाजप अन् शिंदेंकडे बोट दाखवत शिवसैनिकांना दिले मोठे आदेश

Shivsena On Rain : मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. पावसाच्या या संततधारेमुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले असून मुंबईतील अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला.
Uddhav Thackeray On Mumbai Rain
Uddhav Thackeray On Mumbai Rain Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. पावसाच्या या संततधारेमुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले असून मुंबईतील अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. मुंबईतील सायन किंग्ज सर्कल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे. मे महिन्यातच मान्सूनने हजेरी लावल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. याचवेळी आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी पहिल्या पावसामुळे मुंबईत नागरिकांची मोठी गैरसोय होतेय. ही गैरसोय टाळण्यासाठी,सर्व शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या मदतीसाठी सज्ज व्हा!आपल्या मुंबईकरांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, असं आवाहनही शिवसैनिकांना केलं आहे.

तसेच उद्धव ठाकरेंनी भुयारी मेट्रोत पाणी शिरल्यानं भ्रष्टाचार उघडा पडला.गेली तीन वर्षे बीएमसी (BMC) भाजप आणि मिंधे टोळीच्या हातात आहे. त्यांच्याकडून फक्त लूट सुरू आहे.त्याचमुळे रस्त्यावर उतरा आणि लोकांना मदत करा असे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

तर युवासेनेचे प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी मागची दोन महिने नालेसफाई नीट झालेली नाही. मान्सूनपूर्व बैठका महापालिकेने घेतलेल्या नाहीत. स्वत:ला विजनरी,इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब आहेत? हा प्रश्न आहे. त्यांनी खाल्लेला पैसा हा माजी नगरसेवक,पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे, अशी घणाघाती टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.

Uddhav Thackeray On Mumbai Rain
Solapur Congress : काँग्रेसचे विमानसेवेबाबत पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन; मात्र खासदार प्रणिती शिंदेंची अनुपस्थिती!

भाजपाची केंद्र आणि राज्यात मागच्या 10 वर्षांपासून सत्ता आहे.सर्व यंत्रणा सीएम ऑफिस आणि नगरविकास खात्यातून चालतात.त्या किती निकामी आणि भ्रष्ट आहेत ते दिसतंय. त्यामुळे मुंबईकर भाजपवर कधीच विश्वास ठेऊ शकत नाहीत, असा हल्लाबोलही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

याचदरम्यान, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी दोन आठवड्यांपूर्वी मेट्रो 3 चं उद्घाटन झालं.तिथे आत जाऊ दिले जात नाही. इमर्जन्सीसारखी स्थिती आहे. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे,ते पहा असेही ते म्हणाले. तसेच आम्ही “हिंदमाता परिसर 2022 साली पूरमुक्त केला होता. तिथे हिंदमाता पूर नियंत्रण योजना आणली होती.पण आज त्याच हिंदमाता परिसरात आज पाणी साचलं आहे,असंही त्यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray On Mumbai Rain
Ambadas Danve On Amit Shah : बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्यांना दारात उभं केलं नसतं, गळाभेट लांबच!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवर जोरदार पलटवार केला.ते म्हणाले, मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले,आता पाणी राहिलेले नाही. 10 जूननंतर पाऊस येतो तशी तयारी आपण करत असतो.नरिमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला.नागरिकाना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असल्याचंही शिंदेंनी म्हटलं.

याचवेळी मुख्यमंत्री संपर्क ठेऊन आहेत,यंत्रणा अलर्ट आहे असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. माहिम भागात म्हाडा इमारतीचा काही भाग कोसळला आहे. तेथील लोकांना सुरक्षितरित्या दुसरीकडे पाठवण्यात आलं असून आधीच पाऊस पडल्यामुळे थोडी गैरसोय झाली आहे,असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com