Atrocity Threat: थेट तहसीलदारांनाच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; कागलमध्ये एकावर गुन्हा दाखल

Kagal Tehsildar Threat Case, Atrocity Threat, Kagal News: कागल तहसील कार्यालयात कामकाजात अडथळा आणत तहसीलदारांना ॲट्रॉसिटी कायद्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. अधिकाऱ्यांनी दलालांवर कारवाई आणि कार्यालयीन सुरक्षेची मागणी केली.
Police registered a case after an alleged disruption at the Kagal Tehsil office, where the Tehsildar was reportedly threatened during an official dispute.
Police registered a case after an alleged disruption at the Kagal Tehsil office, where the Tehsildar was reportedly threatened during an official dispute.Sarkarnama
Published on
Updated on

Kagal Tehsildar Threat Case: कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करून तहसीलदारांना ॲट्रॉसिटीची धमकी दिल्याचा प्रकार कागल तालुक्यामध्ये घडला आहे. धमकी दिल्याप्रकरणी कागल पोलिसांनी आज पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील राज रघुनाथ कांबळे (वय ३५) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी कागल तहसील कार्यालयात झाला घडला.

Police registered a case after an alleged disruption at the Kagal Tehsil office, where the Tehsildar was reportedly threatened during an official dispute.
ACB Raid: 'परवाना हवा तर लाच द्या'; बीडमध्ये सहाय्यक निबंधकासह तिघे एसीबीच्या रंगेहाथ जाळ्यात

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तहसीलदार अमरदीप वाकडे आणि कांबळे यांच्यात प्रतिज्ञापत्राच्या कामावरून वाद झाला. यातून कांबळे यांनी अर्वाच्य भाषा वापरून कार्यालयीन कामकाजात अडथळा आणला आणि तहसीलदार अमरदीप वाकडे यांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

प्रतिज्ञापत्रांचे काम का झाले नाही, असे म्हणत कांबळे याने तहसीलदारांच्या कक्षात गोंधळ घातला. कागल तालुक्यात कशी नोकरी करता ते मला बघायचे आहे. मी काय आहे, हे दोन दिवसांत दाखवतो. मी सांगेल त्यांची प्रतिज्ञापत्रे आणि दाखल्यांची कामे केली पाहिजेत. अन्यथा ॲट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार करतो, अशी धमकी कांबळे याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Police registered a case after an alleged disruption at the Kagal Tehsil office, where the Tehsildar was reportedly threatened during an official dispute.
ACB Raid : जळगावातील त्या लाचखोर मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरात नेमकं काय दडलंय? ACB कडून गोपनीय झाडाझडती

या प्रकरणात सहायक फौजदार प्रशांत माने तपास करत आहेत. या प्रकरणी कडक कारवाई व्हावी आणि कार्यालयांमधील दलालांचा वावर रोखावा, अशी मागणी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यात म्हटले आहे, की कार्यालय परिसरात दलालांचा वावर वाढला आहे. कार्यालयातील व्हिडिओ करून तो माध्यमांमध्ये प्रसारित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कार्यालयाची बदनामी होत आहे. कागल तालुका महसूल सेवक संघटनेने या घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com