
Mumbai News : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा शेतकर्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी त्यांनी पुन्हा मैदानात उतरणार आहे.दिवाळीनंतर अर्थात नोव्हेंबर महिन्यात ठाकरे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गावांना भेटी देणार आहे.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत:याबाबत माहिती दिली आहे. दिवाळीनंतर मराठवाडा दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.याचवेळी त्यांनी आपण आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच असा शब्दही त्यांनी यावेळी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिला. ते म्हणाले,मी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात येऊन गेलो.तेथून निघताना मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होईपर्यंत या सरकारला सोडणार नसल्याचा शब्द दिला असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या राज्यातील सरकारकडून निव्वळ फसवाफसवी सुरू असून खरडून गेलेल्या जमिनीला त्यांनी हेक्टरी तीन साडेतीन लाख जाहीर केले आहे.सरकारने या साडेतीन लाखांपैकी 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत असंही त्यांनी महायुती सरकारला ठणकावलं.
सध्या शेतकरी हवालदिल झाले आहे. पण मुंबईत असलो, तरी अंबादास दानवे,चंद्रकांत खैरे आदी नेत्यांशी संपर्क माझा संपर्क सुरू असतो. तिकडे काय चालले आहे,याची मला संपूर्ण माहिती मिळते. मी तिकडे पुन्हा दिवाळीनंतर येणार असल्याचं स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आगामी मराठवाडा दौऱ्याचे संकेत दिले आहेत.
ठाकरे म्हणाले,आत्ता सरकारच्या मदतीपैकी फार तटपुंजी जेमतेम मदत शेतकऱ्यांच्या हातात पडत आहे.सरकारकडून शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना नुकसान भरपाई नाही,तर मोलमजुरी मिळाल्यासारखे त्यांना पैसे मिळत आहेत.पण सरकारकडे कर्जाचे पुनर्गठन नव्हे तर कर्जमाफी करा,ही आपली मागणी आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती, हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत, पीक विमा व इतर मागण्यासाठी 'हंबरडा' मोर्चा काढण्यात आला होता. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अॅड. अनिल परब, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह मराठवाड्यातील पदाधिकारी,शिवसैनिक आणि शेतकरी या हंबरडा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाचे रुपांतर छोट्या सभेत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारवर सडकून टीका केली. पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो तेव्हाच सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही, हे मी जाहीर केले होते. शिवसेना तुमच्यासोबत आहेच पण जेव्हा तुमच्यावर संकट असेल तेव्हा तर तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत असूच, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.