PM Modi Vishnu Avatar: 'या'भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बनवलं देव!

BJP Leaders :भाजपमध्ये स्पर्धा, एकाने तर बांधलं मंदिर
avdhut wagh,Narendra Modi, champat rai
avdhut wagh,Narendra Modi, champat raisarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi :अयोध्येत पुढील महिन्यात २२ जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) देवत्व देणारं वक्तव्य पुन्हा एकदा करण्यात आलंय. हे वक्तव्य केलं आहे, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार असल्याचं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं. मात्र,पंतप्रधान मोदींबद्दल असं वक्तव्य करणारे चंपत राय (champat rai) पहिलेच नाहीत.तर, यापूर्वी अनेकांनी अशी वक्तव्ये केली आहेत.

avdhut wagh,Narendra Modi, champat rai
Champat Rai : 'मोदी हे भगवान विष्णूचे अवतार'; श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचं वक्तव्य

भाजपचे महाराष्ट्रातील तत्कालीन प्रवक्ते अवधूत वाघ यांनी काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी विष्णूचे अकरावे अवतार म्हटले होते. त्यावेळी बराच वाद झाला होता.त्यानंतर वाघ यांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थनदेखील केलं होतं. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्री गुलाब देवी यांनी गेल्या वर्षी असंच वक्तव्य करून राजकीय खळबळ उडवून दिली होती.

गुलाब देवी म्हणाल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (,Narendra Modi) यांना देवाचे प्रतिनिधी म्हणून पृथ्वीवर पाठवण्यात आले आहे.आणि त्यांची इच्छा असेल तेवढा काळ ते पंतप्रधानपदी राहू शकतील. गुलाब देवी यांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली. गुलाब देवी यांच्या वक्तव्यापूर्वी मध्य प्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल यांनीही मोदींवर स्तुतीसुमने उधळताना देवाची उपमा दिली होती.पंतप्रधान मोदी अवतारी पुरुष आहेत,असं वक्तव्य करून जेव्हा भारतात संकटे येतात तेव्हा देव पृथ्वीवर जन्म घेतो,अशी पुस्तीही जोडली होती. हे करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना राम आणि श्रीकृष्णाशी केली होती. त्यानंतर वाद झाला होता. मात्र, ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. विशेष म्हणजे यंदा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जेपी नड्डांच्या एका वक्तव्यावरून ते टीकेचे धनी ठरले होते.

avdhut wagh,Narendra Modi, champat rai
Maratha Reservation : ''आज्याच्या, बापाच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असताना...'' ; नाना पटोलेंचा जरांगेंना सवाल!

पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादापासून कर्नाटकची जनता वंचित राहू नये म्हणून कमळाला जिंकवा, असं आवाहन जेपी नड्डा यांनी केलं होतं. त्यावरून काँग्रेसनं हा कर्नाटकच्या जनतेचा अपमान असल्याचा पलटवार केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे सर्व एवढ्यावरच थांबले नाही तर दोन वर्षांपूर्वी भाजपच्या एका कार्यकर्त्यानं पुण्यातील औंधमध्ये मोठा खर्च करून पंतप्रधान मोदींचं मंदिर बांधलं. याचीही बरीच चर्चा झाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचे अवतार असल्याची वक्तव्ये काही नवीन नाहीत. पण अशा वक्तव्यांना स्वतः मोदी अथवा त्यांच्या पक्षाकडून कधीही लगाम लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वेळोवेळी अशी वक्तव्ये केली जातात.

(Edited By : Roshan More)

avdhut wagh,Narendra Modi, champat rai
Arvind Kejriwal : इंडिया आघाडीत फूट? अरविंद केजरीवाल यांच्या 'या' दाव्याने खळबळ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com