Ujjwal Nikam Commnets on Political Entry: मी राजकारणात येणार नाही; उज्वल निकम

Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
Ujjwal Nikam Commnets on Political Entry:
Ujjwal Nikam Commnets on Political Entry:Sarkarnama

Ujjwal Nikam Commnets on Political Entry : राज्य आणि देशपातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढवणारे, अशी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची ओळख आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकारणात प्रवेशाची चर्चा आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी स्वतं: आपल्या राजकारणातील प्रवेशाबाबत भाष्य केलं आहे.

''सध्या तरी राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. कारण राज्याच्या राजकारणात जी अस्थिरता आणि गढुळता निर्माण झाली आहे, ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तीने सध्या तरी राजकारणात येणं योग्य नाही. असं माझं मन मला सांगत आहे. त्यामुळे सध्यातरी राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही,'' अशी टीका करत उज्वल निकम यांनी आपल्या राजकारणात येणाऱ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. (Maharashtra Politics)

Ujjwal Nikam Commnets on Political Entry:
Ujwal Nikam on Supreme Court Judgment: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे भाष्य

तसेच, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागेल, हे सांगणं आज जरी कठीण असलं तरी माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापिठातील काही न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागेल.असंही उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. (Supreme Court Hearing)

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याआधीही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.पण तेव्हाही आपण राजकारणात जाणार नसल्याचं निकम यांनी स्पष्ट केल होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने मला लोकसभा लढण्याची ऑफर दिली होती.पण मी ती नाकारली. तर शिवसेना नेत्यांशी माझे जुने संबंध आहेत. पण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीत आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असही त्यांनी त्यावेळी स्पष्टं केलं होतं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com